एस. टी.च्या चालक - वाहकांना मास्कचे वावडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:44 IST2021-02-05T08:44:57+5:302021-02-05T08:44:57+5:30
मास्क न वापरणाऱ्यांकडे दुर्लक्ष कोरोनाचा काळ सुरु झाल्यानंतर संपूर्ण राज्यात परिवहन महामंडळाच्या बसेस बंद करण्यात आल्या. कारण बसमध्ये होणारी ...

एस. टी.च्या चालक - वाहकांना मास्कचे वावडे
मास्क न वापरणाऱ्यांकडे दुर्लक्ष
कोरोनाचा काळ सुरु झाल्यानंतर संपूर्ण राज्यात परिवहन महामंडळाच्या बसेस बंद करण्यात आल्या. कारण बसमध्ये होणारी गर्दी ही कोरोनासाठी पोषक असल्याची वस्तुस्थिती होती. बसेस बंद झाल्याने कोट्यवधींचा फटका परिवहन महामंडळाला सहन करावा लागला आहे. मास्क नाही तर बसमध्ये प्रवेश नाही, असे बसच्या बाहेर लिहिलेले असूनसुध्दा वाहक, चालक हेच याकडे दुर्लक्ष करत असतील तर उपयोग काय?
प्रबोधनाचा उपयोग शुन्य
कोरोनाचा काळ सुरु झाल्यानंतर मास्क वापरण्याच्या सूचनाच नाही तर मास्क वापरण्याचे बंधनकारक करण्यात आले. त्याचा वापर करत असताना सुरुवातीला प्रबोधन करण्यात आले. वेगवेगळ्या संस्थांसह शासनाच्या माध्यमातून जनजागृती देखील करण्यात आली. त्याचा फायदा शेवटी स्वत:ला आणि इतरांना असताना देखील प्रबोधन करुन उपयोग काय, असा सवाल आता उपस्थित होत आहे.
महामंडळ दखल घेणार का?
राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेस आता कुठे वर्षभरानंतर पूर्वपदावर येत आहेत. प्रवासीदेखील घराबाहेर पडू लागले आहेत. प्रवाशांची काळजी घेणे ही सर्वस्वी जबाबदारी ही शेवटी महामंडळाची असल्याचे अधोरेखित होत आहे. त्यात पुन्हा बसमध्ये वाहक आणि चालक हेच मास्क वापरणार नसतील तर काय उपयोग? याची दखल आता राज्य मार्ग परिवहन महामंडळ प्रशासनाने घेण्याची आवश्यकता आहे.