रोटरी स्कूलचा वार्षिक क्रीडा दिवस साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2019 21:50 IST2019-01-01T21:49:13+5:302019-01-01T21:50:08+5:30

दोंडाईचा : २१९ विद्यार्थ्यांचा सहभाग

Rotary School's annual sports day is celebrated | रोटरी स्कूलचा वार्षिक क्रीडा दिवस साजरा

dhule

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : येथील रोटरी इंग्लिश स्कूलतर्फे वार्षिक क्रीड़ा स्पर्धा घेण्यात आली दरम्यान या स्पर्धेत सुमारे २१९ खेळाडूंनी सहभाग घेतला होता़
दोडाईचा येथील रोटरी इंग्लिश स्कूलच्या पटागणनात क्रीडा दिवस साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अपर तहसीलदार डॉ़ उल्हास देवरे तर प्रमुख पाहुणे रोटरी स्कूल अध्यक्ष हिमांशू शाह, व्यापारी असोशियशनचे राहूल कवाड़ , डॉ मुकुंद सोहोंनी ,मदनलाल इंदाणी , रमेश पारख, श्रीमती हेतल शाह, श्रीकांत इंदानी, प्राचार्य एम.पी.पवार आदी होते.
यास्पर्धेत थालिफेक, गोलाफेक, भालाफेक, कबड्डी, खो-खो, क्रिकेट, हैंडबॉल, फुटबॉल आदी स्पर्धा घेण्यात आल्यात़ विजेत्या खेळाडूंना मान्यवराचा हस्ते पदक गौरविण्यात आले. यशस्वीतेसाठी क्रीड़ा शिक्षक अजय हजारे, जाफर मिश्रा, पूजा गिरासे आदींनी प्रयत्न केले़

Web Title: Rotary School's annual sports day is celebrated

टॅग्स :Dhuleधुळे