बाबासाहेबांची भूमिका माझ्यासाठी गौरवास्पद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2020 13:53 IST2020-02-19T13:52:30+5:302020-02-19T13:53:39+5:30
चंद्रकांत सोनार । लोकमत न्यूज नेटवर्क महामानव डॉ़ बाबासाहेब आंबेडकर एका धर्माचे किंवा एका जातीचे मुळीच नव्हते़ त्यांचे कार्य ...

dhule
चंद्रकांत सोनार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
महामानव डॉ़ बाबासाहेब आंबेडकर एका धर्माचे किंवा एका जातीचे मुळीच नव्हते़ त्यांचे कार्य सर्वव्यापी असतांनाही आजच्या समाज व्यवस्थेने महापुरूषांना वाटून घेतले आहे़ बाबासाहेबांना अपेक्षित असलेला समाज तसेच त्यांनी दिलेली शिकवण सर्वांपुढे यावा, त्यांचा आदर्श घेऊन चांगला माणूस घडावा या उद्ेशाने या मालिकतून प्रयत्न केला आहे़ असे मत डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मालिकेत भूमिका साकारणारे अभिनेता सागर देशमुख यांनी लोकमत शी बोलतांना सांगितले़
प्रश्न : डॉ़ बाबासाहेब आंबेडकरांची भुमिका करतांना काय अनुभव मिळाला?
देशमुख : सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक, पत्रकारिता, कायदे अशा विविध क्षेत्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अथांग अनुभव होता़ अशा महामानवासोबत माझी तुलना कधीच होऊ शकत नाही़ त्यांची भूमिका साकारण्यासाठी अनेक पुस्तकांचे वाचन केले़ तरीही अभिनय करतांना माझ्या मनात खुप भिती असायची़
प्रश्न : पु़ ल़ देशपांडे व डॉ़ बाबासाहेंब आंबेडकर यांची तुम्ही भूमिका साकारली, त्याविषयी काय सांगाल ?
देशमुख : पु़ ल़ देशपांडे म्हणजे सर्वांना जवळ घेणारे साहित्यिक होते़ तर डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा दबदबा असल्याने कोणी सहसा जवळ येत नव्हते़ एक साहित्यिक तर दुसरे विविध कार्यात व्यक्तीची भूमिका साकारतांना कधी नम्रता तर कधी कठोरता अशी भूमिका मला मालिकेच्या अभिनयात घ्यावी लागली़
डॉ़ आंबेडकरांची भूमिका करण्याचं धाडस कसे मिळाले?
देशमुख : पुण्यात वकीलीचे शिक्षण घेत असतांना प्रख्यात कायदेतज्ज्ञ डॉ़ बाबासाहेंब यांच्या वकीली क्षेत्रातील प्रदिर्घ अभ्यास अनुभवला होता़ ज्यावेळी मला त्यांचीच भूमिका करण्यासाठी फोन आला़ त्यावेळी मी क्षणाचाही विचार न करता होकार दिला़ त्यानंतर मात्र, माझ्याकडून खरोखर एवढ्या महान व्यक्तीचे अभिनय होईल का? या भितीने मला रात्रभर झोप लागली नव्हती़
वडीलांची शिक्षणाचे महत्व पटवून दिले़
डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांचे वडील सुभेदार रामजी यांनी लहान पणापासून आयुष्यातील कठीण गोष्टींना तोंड देत, प्रसंगी पोटाला चिमटे काढून, काटकसर करुन चांगला माणूस म्हणून शिकवलं, चांगली व्यक्ती म्हणून घडवलं, त्यांनीच शिक्षण त्यांची अंगी जोपासले़ आणि अशाच रामजी बाबांचं मालिकेत देहावसानाचा दाखवलेला प्रसंग भावनिक वळण देणारा ठरला़
सुभाषचंद्र बोस यांची भूमिका मला आवडेल
साहित्य पू़ल देशपाडे, त्यांनतर महामानव डॉ़ आंबेडकर यांच्या भूमिका करण्याची मला संधी मिळाली़ ही बाब माझ्यासाठी गौरवास्पद आहे़ या मालिकेनंतर जर मला भविष्यात सुभाषचंद्र बोस यांनी भूमिका करण्याची संधी मिळाली तर मी नक्की करेल असेही मराठी अभिनेता सागर देशमुख यांनी धुळ्यातील एका कार्यक्रमात बोलतांना सांगितले़