सोंडले शिवारातील पेट्रोल पंपावर लूट?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 23:01 IST2020-02-08T23:00:56+5:302020-02-08T23:01:20+5:30
शिंदखेडा तालुका। दोन संशयित मात्र फरार

सोंडले शिवारातील पेट्रोल पंपावर लूट?
शिंदखेडा : शिंदखेडा तालुक्यातील सोंडले शिवारातील शिव पेट्रोल पंपावर शनिवारी पहाटेच्या सुमारास ट्रक लुटीसह पेट्रोल पंप लुटीचा प्रयत्न झाला. परिसरातील शेतकऱ्यांसह नागरिक धावून आल्याले लुटीचा प्रयत्न फसला़ यातील दोन जण फरार झाले आहेत़ दोन संशयितांना पकडण्यात आले़
लुटमार सुरू असल्याचे पहाताच पेट्रोल पंपशेजारील ढाब्याचे कारागीर व काही शेतकरी धावत तेथे आले. त्यांनी लुटीतील दोन संशयितांना पकडले व चांगलाच चोप देत शिंदखेडा पोलीसांच्या ताब्यात दिले. तर दोन संशयित फरार झाले.
प्राप्त माहितीनुसार, एक ट्राला लुटण्यासाठी दोंडाईचाहून चार संशयित कारने पाठलाग करीत सोंडले शिवारातील शिव पेट्रोल पंपावर पोहचले. तेथे ट्राला चालकास चौघांनी मारहाण करून काही रक्कम लुटली. याप्रकरणी काय होत आहे हे पहाण्यास गेलेला पंप व्यवस्थापक दीपक अहिरराव यालाही मारहाण करण्यात आली. व त्याच्याजवळील सुमारे १४ हजाराची रोख हिसकावून घेतली. मारहाणीत दोन जखमी झाले. जवळच्या ढाब्यावरील व शेतातील काही जण धावत आले. त्यावेळी पळ काढण्याचा प्रयत्न करणाºया दोघांना लोकांनी ताब्यात घेऊन चोप दिला.