लूट करणारे तिघे गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 23:03 IST2019-11-18T23:02:39+5:302019-11-18T23:03:00+5:30
नरडाणा पोलिसांची धडक कारवाई : वाहनासह मुद्देमालही हस्तगत

लूट करणारे तिघे गजाआड
नरडाणा : टायर दुकानदाराला मारहाण केल्यानंतर रोख रकमेसह मोबाईल घेवून पोबारा करणाºयांच्या मुसक्या आवळण्यात नरडाणा पोलिसांना यश आले आहे़ त्यातील एकाला पाठलाग करुन पकडले़ तर दोघांना मालेगाव येथे जावून ताब्यात घेतले़ ही घटना १६ नोव्हेंबर रोजी पहाटेच्या सुमारास घडली होती़
मुंबई - आग्रा राष्ट्रीय महामार्गालगत नरडाणा गावाजवळ खोपडे पेट्रोलपंप आहे़ या पंपालगतच यु़ के़ टायर नावाचे दुकान असून दुकानात मालक उन्नी कृष्णन नारायण नायर आणि त्यांचा कर्मचारी तहसीन अन्सारी असे दोघे झोपलेले होते़ ही संधी साधून एमएच २० सीएच १३७५ क्रमांकाच्या चार चाकी वाहनातून आले़ त्यांनी टायर दुकानाचे मालक आणि त्यांच्या सोबतचा कर्मचारी यांना मारहाण केली़ त्यांच्या खिशातील रोख १ हजार, ६ हजार रुपये किंमतीचे दोन मोबाईल जबरीने काढून घेवून पसार झाले होते़ लुटीची ही घटना १६ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री १२ ते पहाटे १ वाजेच्या सुमारास घडली होती़
नरडाणा पोलीस ठाण्याचे रात्रगस्त घालणाºया कर्मचाºयांना घटनेची माहिती देण्यात आली़ पळून जाणाºया चारचाकी वाहनाचा शोध घेवून ती मिळून येताच तिचा पाठलाग करण्यात आला़ पोलीस मागावर असल्याचे पाहून त्यांनी वाहन दुभाजकाला धडक देवून थांबविले आणि पोबारा केला़ या चोरट्यांचा पाठलाग पोलिसांनी थांबविला नाही़ पाठलाग करुन सय्यद अफसर सय्यद अजहर (२०, पवारवाडी, मालेगाव) याला ताब्यात घेण्यात आले़
यानंतर साबीर उर्फ भुºया जैनुद्दीन दादामिया (२२) आणि सलमान अहमद सलीम अहमद (२१) (दोन्ही रा़ आयशानगर, मालेगाव) यांना पोलिसांनी मालेगाव येथे जावून ताब्यात घेतले़
त्यांच्याकडून पोलिसांनी ३ लाख रुपये किंमतीचे वाहन, २ हजार रुपये किंमतीचा मोबाईल, १ हजार रुपये रोख असा एकूण ३ लाख ३ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे़
दुकान मालकाच्या फिर्यादीवरुन भादंवि कलम ३९४, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे़
पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे, अपर पोलीस अधीक्षक डॉ़ राजू भुजबळ, उप अधीक्षक अनिल माने यांच्या मार्गदर्शनाखाली नरडाणा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक योगेश राजगुरु, पोलीस उपनिरीक्षक संदिप पाटील, कर्मचारी प्रकाश माळी, योगेश पुकळे, अकिल पठाण, भूषण वाडीले, विशाल जाधव, चालक अशोक पाटील यांनी ही कारवाई केली आहे़