देवपूर भागातील रस्ते होणार काँक्रिटीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:42 IST2021-08-18T04:42:58+5:302021-08-18T04:42:58+5:30
या भागातील रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली होती. त्यामुळे परिसरातील नागरिकांना ये-जा करणाऱ्यांसाठी समस्यांचा सामना करावा लागत होता. या ...

देवपूर भागातील रस्ते होणार काँक्रिटीकरण
या भागातील रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली होती. त्यामुळे परिसरातील नागरिकांना ये-जा करणाऱ्यांसाठी समस्यांचा सामना करावा लागत होता. या ठिकाणी मागील काही आठवड्यांपूर्वी आमदार फारूक शाह यांनी येथील नागरिकांनी निवेदन दिले होते. यावरून आमदार फारूक शाह यांच्या आदेशावरून सेहबाज फारूक शाह यांनी सदर भागांची पाहणी करत तत्काळ रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार येथील नगरसेवक गनी डॉलर यांच्या प्रयत्नातून मनपा स्थानिक विकास निधीतून हाजी फजलू रेहमान यांच्या घरापासून ते हाजी बदलू सरदार चौकापावेतोच्या रस्ता काँक्रिटीकरणासाठी २० लाखांचा निधी मंजूर झाला. या कामांचे शुभारंभ सामाजिक कार्यकर्ते सलीम अन्वर शाह यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मनपाचे नगसेवक युसुफ मुल्ला, सईद बेग, नासीर पठाण, गनी डॉलर, महिला जिल्हाध्यक्ष डॉ. दीपश्री नाईक, धुळे महिला शहराध्यक्ष फातेमा अन्सारी, शहराध्यक्ष नुरा ठेकेदार, युवा जिल्हाध्यक्ष सेहबाज शाह, अफसर शाह, आसिफ पोपट शाह, कैसर पेंटर, परवेज शाह, हाजी छोटू शेठ, जुनेद पठाण, वसीम अक्रम, सलमान खान, वसीम पिंजारी, नझर खान, आकिब खान आदींसह कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.