शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

वाढत्या तापमानाने रस्ते ओस 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2019 11:51 IST

पारा ४१.८ अंशावर : भारनियमनाचाही फटका, खबरदारीचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे :  उष्णतेच्या लाटेत सध्या धुळेकर होरपळत असून ‘मार्च हिट’ चा अनुभव घेत आहेत. यंदाच्या मोसमातील सर्वोच्च तापमान शुक्रवारी ४२़०२ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले होते. तर शनिवारी तापमानात काहीशी घट होऊन ४१़८ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदविण्यात आले़ चार-पाच दिवसांपासून कडाका कायम असून तापमानमुळे दैनंदिन जनजीवनावर परिणाम झाला आहे. यंदा फेब्रुवारी महिन्यापासूनच उन्हाची तीव्रता वाढली असून मार्च महिन्यात तापमानाने चाळिशी ओलांडली होती़ धुळ्यात दरवर्षी कमाल तापमान ४१ ते ४२ अंशांपर्यंत जात असते़, त्यामुळे राज्यातील उष्ण शहरांच्या यादीत धुळ्याचा समावेश असतो़  परंतु, यावर्षी फेब्रुवारीपासूनच उन्हाची तीव्रता जाणवू लागली होती. तर चालू मार्च महिन्यातच तापमानाने ‘चाळिशी’ ओलांडली आहे़ दैनंदिन जनजीवन विस्कळीतउष्णतेच्या लाटेमुळे धुळ्यातील रस्ते दुपारी ओस पडत असून शुकशुकाट जाणवतो. शीतपेयांना मागणी वाढली असून टोप्या, उपरणे, रुमाल, गॉगल्सचा वापर केल्याशिवाय घराबाहेर निघणे अशक्य होत आहे़  अनेक व्यावसायिक दुपारच्या वेळी दुकाने बंद ठेवत आहेत़ त्यातच नदी, तलाव, कूपनलिका, विहिरी आटल्याने पाणीटंचाईचा सामना धुळेकरांना करावा लागत आहे़ भरउन्हात पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे़  जिल्हा प्रशासनाने ाापमान वाढीचा इशारा दिला आहे़  आरोग्याच्या तक्रारींमध्ये वाढ उष्णतेच्या लाटेचा तडाखा बसत असल्याने आरोग्याच्या तक्रारी वाढल्या आहेत़ तीव्र उन्हामुळे अस्वस्थपणा, थकवा, शरीर तापणे, अंगदुखी, डोकेदुखी, मळमळ ही लक्षणे आढळून येत असून मनपा प्रशासनाने खबरदारीचे आवाहन केले आहे़ रखरखत्या उन्हामुळे अंगाची काहिली होत असून ‘मार्च हॉट’मुळे नागरिक अक्षरश: हैराण झाले आहेत़ त्यामुळे दुपारी १२ वाजेपासूनच वर्दळीचे रस्ते ओस पडत आहे़ हवामान खात्याने उत्तर मध्य महाराष्ट्रात उष्णतेची लाट येणार असल्याचा इशारा दिला होता. १६ मार्चपासून तापमानाने उच्चांक गाठल्याने धुळेकरांना चटके बसत आहे़ त्यामुळे थंडगार पाणी, आईस्क्रिम पार्लर, रसवंती, शितपेयांची दुकाने, लिंबूपाणी, गोला या शितपदार्थांना मागणी वाढली आहे़ सकाळपासूनच उन्हाची दाहकता जाणवत असून सायंकाळी उशिरापर्यंत झळा जाणवत आहेत़ नागरिक शक्य तेवढी कामे लवकर आटोपून घराकडे परतत असल्याने दुपारी १२ ते ५ यावेळेत वर्दळ मंदावत आहे. त्यामुळे अघोषित संचारबंदीसारखी स्थिती दिसते. ‘मे हीट’चा अनुभव मार्चमध्येच येत आहे.  भारनियमाचे संकट उन्हाच्या झळा व विजेचे भारनियमन असा दुहेरी त्रास सध्या नागरिकांना सहन करावा लागत आहे़ दुपारी विश्रांतीच्या वेळी अचानक वीज गुल होत असल्याने पंखे, कुलर, एसी असूनही झोपेचे खोबरे होत असल्याने नागरिकांना मोठाच मनस्ताप सहन करावा लागत आहे़ उन्हाळ्यात होणारा उष्माघात टाळण्यासाठी नागरिकांनी बाहेर जातांना गॉगल, छत्री, टोपी, बुट व चप्पलचा वापर करावा, तसेच प्रवास करतांना पाण्याची बॉटल सोबत ठेवावी, आहारात मासे, मटण, तेलकट पदार्थ, शिळे अन्न खाणे टाळावे़ -डॉ़बी़बी़ माळी , आरोग्य अधिकारी, महापालिका

टॅग्स :Dhuleधुळे