धुळ्यात ३० जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:25 IST2021-06-18T04:25:32+5:302021-06-18T04:25:32+5:30
धुळे : येथील वडजाई रोडवरील निंबूच्या शेताजवळ एका हाॅटेलसमोर झालेल्या दंगलप्रकरणी पोलिसांनी ३० जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल केला आहे. ...

धुळ्यात ३० जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल
धुळे : येथील वडजाई रोडवरील निंबूच्या शेताजवळ एका हाॅटेलसमोर झालेल्या दंगलप्रकरणी पोलिसांनी ३० जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल केला आहे.
शहरातील वडजाई रोडवर मंगळवारी रात्री ११.१२ वाजेच्या सुमाराला दोन गटांमध्ये लाठ्या-काठ्या, लोखंडी राॅड, बेसबाॅलचे दांडे यांच्या साहाय्याने झुंज झाली. याप्रकरणी दाेन्ही गटांपैकी कुणीही फिर्याद दिली नाही; परंतु या दंगलीची माहिती पोलिसांना मिळाल्यावर पोलिसांनी स्वत: बुधवारी रात्री गुन्हा दाखल करून घेतला आहे. दंगल माजवली तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केले म्हणून हेड काॅन्स्टेबल धर्मेंद्र सुरेश काटकर (४३) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात भादंवि कलम १४३, १४७, १४८, १४९, १६०, ४२७ सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१)(३) चे उल्लंघन १३५ तसेच ११०/११७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संशयितांची नावे अशी
साबीर शाह, मोहम्मद साद, अरबाज सत्तार, नईम बोक्या, वसीम शाह ऊर्फ मुन्ना, इमरान जोली, एजाज शाह, शोएब मुल्ला, पापा शाह, आरीफ जाल्या, अब्दुल रज्जाक अन्सारी, वसीम अन्सारी, अब्दुल अहाद, अख्तर पैलवान, समीर अहमद मोहम्मद, शफिक आणि इतर १० ते १५ जण अशी संशयितांची नावे आहेत.