१२ लाख मतदार बजावणार मतदानाचा हक्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2020 21:57 IST2020-01-01T21:56:38+5:302020-01-01T21:57:16+5:30
प्रचारात रंगत आलेली आहे.

Dhule
धुळे :जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारासाठी चारच दिवस राहिलेले असून, पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आमदार, माजी आमदार मैदानात उतरल्याने, प्रचारात रंगत आलेली आहे.
आमदार पाटील यांची प्रचार फेरी
अर्ज माघारीनंतर महाविकास आघाडीने प्रचाराचा शुभारंभ केला. मुकटी गट व गणातील महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ आमदार कुणाल पाटील यांनी मुकटी गावात मतदारांच्या भेटी घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी आमदार कुणाल पाटील म्हणाले जिल्ह्याच्या विकासासाठी जिल्हा परिषद व पंचायत समितीतमध्ये सत्ता येणे आवश्यक आहे. विकास कामांसाठी जास्तीत जास्त निधी आणून जि.प. पदाधिकाऱ्यांच्या समन्वयातून प्रत्येक गावाच्या विकासाला चालना देता येईल. यावेळी मुकटी गटातील आघाडीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
आमदार रावल यांनी घेतल्या भेटी
माजी मंत्री व आमदार जयकुमार रावल यांनी शिंदखेडा तालुक्यातील धमाणे गट व गणातील उमेदवारांच्या प्रचारार्थ रॅली काढली होती. आ रावल यांनी तावखेडा, दाऊळ, मंदाने, लंघाणे,कुंभारे, कळगाव, लोहगाव , वसमाने, रंजाने, यासह विविध गावातील मतदारांना आवाहन केले. यावेळी त्यांच्यासमवेत दाजभाऊ माळी, जिजाब राव सोनवणे, भारत ईशी, बाळकृष्ण ईशी, कुणाल पवार, कोळी समाजचे नेते देविदास कोळी,रमेश पाटील,आनंनसिंग गिरासे, सुनील माळी,जुने कोळदे सरपंच भिल, माजी सरपंच बालू दादा गिरासे, छोटू पाटील,विजयसिंग गिरासे, सदाशिव पाटील, लोटन पाटील, मुरलीधर पाटील,जगतसिंग गिरासे, भोजसिंग गिरासे,सीताराम पाटील आदी उपस्थित होते.
अमरिशभाई पटेल यांची
अर्थे येथे सभा
अर्थे येथील कवी कुसूमाग्रज विद्यालयाच्या प्रांगणात विखरण गट-गणातील उमेदवारांच्या प्रचारार्थ नारळ वाढविण्याच्या कार्यक्रम व जाहीर सभा घेण्यात आली़ यावेळी माजी मंत्री अमरिशभाई पटेल, खासदार डॉ़हीना गावीत, आमदार काशिराम पावरा, उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, उद्योगपती तपनभाई पटेल, भाजपा जिल्हाध्यक्ष बबन चौधरी, तालुकाध्यक्ष राहुल रंधे, डॉ़तुषार रंधे, ग् डॉ़शशिकांत पाटील, विनीता पाटील, प्रभाकर चव्हाण, दिलीप लोहार, माधव पाटील, दीपक गुजर, लक्ष्मण पाटील त् उपस्थित होते़
सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांच्या जीवनात कसा बदल करता येईल याकरीता अहोरात्र मेहनत करीत आहे़ जे-जे विकासाचे धोरण देश-राज्यात आखले जात आहे, हे आपण गेल्या ३० वर्षापूर्वीच या तालुक्यात केल्याचे प्रतिपादन माजी मंत्री अमरिशभाई पटेल यांनी येथे केले. यावेळी आमदार पावरा यांनीही कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.