वार्सा फाट्यावर रिक्षा झाडावर आदळली, मुलगा ठार, ७ जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 22:35 IST2020-08-18T22:35:03+5:302020-08-18T22:35:29+5:30
सुरत नागपूर महामार्ग : सर्व प्रवासी जाड गावातले

वार्सा फाट्यावर रिक्षा झाडावर आदळली, मुलगा ठार, ७ जखमी
पिंपळनेर : सुरत नागपूर महामार्गावरील वार्सा फाट्यावर भरधाव अॅपेरिक्षा रस्त्याच्या खाली उतरुन झाडाला धडकली़ या अपघातात एका मुलाचा मृत्यू झाला़ तर अन्य सात जणं जखमी झाल्याची घटना सोमवारी दुपारी घडली़
साक्री तालुक्यातील देगाव येथील योगेश गुलाब ठाकरे (३०) या रिक्षा चालकाने सटाणा तालुक्यातील जाड येथून काही प्रवासी बसवून ते साक्री तालुक्यातील आमळी गावाकडे घेऊन जात होता़ नवापूरकडे जाणाऱ्या रोडावरील वार्सा फाट्याजवळ योगेश ठाकरे याने रस्त्याच्या स्थितीकडे लक्ष न देता जोराने वाहन चालवित नेल्याने रिक्षा रस्त्याच्या कडेला उतरवली आणि झाडावर रिक्षा आदळली़ त्यामुळे झालेल्या अपघातात रिक्षात बसलेला आदेश उत्तम कांबळी (१५, रा़ जाड ता़ सटाणा) हा गंभीर जखमी झाल्याने मयत झाला़ तर, रिक्षात बसलेले अन्य प्रवाश्यांमध्ये शिवाजी पंढरीनाथ आहिरे, युवराज उत्तम कांबळी, राणी भगाराम अहिरे, अनुजा रमशे, प्रियंका पोपट अहिरे, दिपाली रमेश भोये (सर्व रा़ जाड ता़ सटाणा) हे जखमी झाले आहेत़ याप्रकरणी रिक्षा चालक योगेश ठाकरे याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़