पदोन्नती आरक्षण रद्दचा निर्णय मागे घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:27 IST2021-06-02T04:27:08+5:302021-06-02T04:27:08+5:30
धुळे : मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या पदाेन्नती आरक्षण रद्दचा निर्णय त्वरित मागे घ्यावा, अशी मागणी करीत बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी ...

पदोन्नती आरक्षण रद्दचा निर्णय मागे घ्या
धुळे : मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या पदाेन्नती आरक्षण रद्दचा निर्णय त्वरित मागे घ्यावा, अशी मागणी करीत बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने केली.
पदोन्नती आरक्षणासाठी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीतर्फे राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले. सर्व जिल्ह्यांमध्ये दुपारी दोन ते चार या वेळेत निदर्शने करण्यात आली. धुळ्यात देखील कोरोना नियमांचे पालन करीत आंदोलन झाले.
जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. मागासवर्ग कर्मचारी पदोन्नती आरक्षणविरोधी निर्णय त्वरित रद्द करावा; अथवा त्यात सर्वोच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशानुसार सुधारणा करून मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना बिंदू नामावलीनुसार पदोन्नती द्यावी. त्यासाठी ७ मे रोजीच्या शासन निर्णयात सुधारणा करून सुधारित शासन निर्णय जारी करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
निदर्शने करताना उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष भालचंद्र सोनगत, महिला आघाडीच्या उत्तर महाराष्ट्र सचिव नजमा पटेल, शहराध्यक्ष इमरान पठाण, तालुकाध्यक्ष सलीम शिकलकर, विजया कुमावत, शबाना शेख, अभिषेक पवार, सुलतान अन्सारी, जयेश अहिरे, किरण बोरसे, तेजकिरण जाधव, पंकज ठाकूर, जितेंद्र नगराळे, शरीफ बागवान, राहित चांगरे, प्रशांत वाघ, जयेश शिंदे, जितेंद्र खैरनार, गाैरव सोनवणे, राजरत्न अहिरे, मनीष सोहिते, नईम, सुलतान पेंटर आदी उपस्थित होते.