शहरं
Join us  
Trending Stories
1
“अरविंद केजरीवाल कार्यालयात महात्मा गांधींची प्रतिमा का लावत नाहीत”; काँग्रेसचा थेट सवाल
2
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
3
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
4
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
5
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
6
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
7
"माझी मुलं श्रेयस अय्यरला हाक मारताना..."; प्रिती झिंटाने IPLच्या 'सरपंच'बद्दल केला खुलासा
8
Harsha Richhariya : "एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान
9
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
10
रशियाने दिलेला शब्द पाळला! चौथी S-400 प्रणाली भारतात दाखल; आता शत्रूचे विमान हवेतच भस्म होणार
11
१५ ऑगस्टपर्यंत रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्याची संधी; सरनाईक यांनी दिली १०० दिवसांची सवलत
12
चेअर कार, स्लीपर, मेट्रो झाली, आता वंदे भारत कार्गो येणार, मालवाहतूक क्षमता अन् वेग किती?
13
भारतात उष्णतेची लाट, तिकडे चीनमध्ये महापूर, रस्ते, घरे, वाहने पाण्याखाली
14
बुध प्रदोष २०२६: कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा आणि कोणाचा सुरु होणार कठीण काळ?
15
Post Officeची जबरदस्त योजना : एकदाच करा गुंतवणूक आणि दरमहा मिळवा ₹९,२५०; ५ वर्षांनी संपूर्ण पैसेही परत
16
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
17
सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले...
18
Gold Silver Price Today: ₹५००० पेक्षा अधिकनं घसरला चांदीचा भाव; सोन्याच्या दरातही मोठी घसरण; आज इतक्या रुपयांना मिळतंय १० ग्रॅम Gold
19
६.८३-इंच AMOLED डिस्प्ले, १०,२०० mAh बॅटरी; Vivo Y600 लॉन्च, जाणून घ्या किंमत!
20
मुंबईतून सुटणारी वंदे भारत ट्रेन आता कायस्वरुपी २० कोचसह धावणार; प्रवासी क्षमता किती वाढणार? 
Daily Top 2Weekly Top 5

अवघ्या तासाभरात लागला निकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 22:07 IST

धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पोटनिवडणूक

धुळे : विधान परिषदेच्या धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पोटनिवडणुकीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात गुरुवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास प्रारंभ झाला. दोनच उमेदवार आमने-सामने आणि पहिल्या पसंती क्रमांकाची मते मोजूनच निकाल स्पष्ट होणार असल्याने मतमोजणी सुरु झाल्यावर अवघ्या तासाभरात निकाल स्पष्ट झाला. मात्र, निकालाची घोषणा जिल्हाधिकारी यांनी सव्वा अकरा वाजेच्या सुमारास केली. त्यानंतर भाजप समर्थकांनी मतमोजणी केंद्राबाहेर जल्लोष केला.सकाळी मतमोजणीला सुरुवातजिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाजूला असलेल्या नियोजन सभागृहात विधान परिषदेच्या मतमोजणीची प्रक्रिया राबविण्यात आली. सकाळी ८ वाजेच्या सुमारास सुरुवात झाली. धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील दहाही मतदान केंद्राच्या मतपेट्या एकत्र आणण्यात आल्या. सर्व मतपेढ्या फोडून त्यातील चिठ्यांची मोजणी करीत झालेले मतदान व प्राप्त झालेले मतदान याची खात्री करण्यात आली. त्यातील वैध व अवैध मते वेगवेगळी करण्यात आली. ४ मते अवैध तर ४३० मते वैध ठरविण्यात आली. त्यामुळे आयोगाच्या सुचनेनुसार वैध मते भागिले दोन अधिक १ या सुत्रांप्रमाणे विजयी उमेदवारांसाठी २१६ मतांचा कोटा निश्चित करण्यात आला. त्यानंतर प्रत्यक्ष मोजणीला सुरुवात झाली. सुरुवातीपासून भाजपचे उमेदवार अमरिशभाई पटेल हे आघाडीवर राहिले. त्यानंतर अवघ्या तासाभरानंतर रेकॉर्ड ब्रेक मतमोजणी करुन निकाल घोषीत करण्यात आला. अवैध ठरलेल्या चार मतांपैकी दोन मतपत्रिका कोऱ्या तर दोन मतपत्रिकेवर चुकीच्या पध्दतीने मतदान केल्याने त्या बाद ठरविल्याचे सांगण्यात आले.विजयाचा औपचारीक जल्लोषमतमोजणीअंती भाजपचे उमेदवार अमरिशभाईंना ३३२ मते मिळाली. तर महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजीत पाटील यांना तीन आकडी संख्याही गाठता आली नाही. ९८ मतांवर त्यांना समाधान मानावे लागले. अमरिशभाई यांच्या विजयाची घोषणा होताच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर समर्थकांनी फटाके फोडले.वाहनांचा ताफा दाखलविजयी झाल्याची बातमी कळाल्यानंतर अमरिशभाई पटेल आपल्या हिंतचिंतकांसोबत वाहनांच्या ताफाने दाखल झाले. यावेळी खासदार डॉ. सुभाष भामरे, आमदार काशिराम पावरा, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, जि. प. अध्यक्ष तुषार रंधे, महापौर चंद्रकांत सोनार, उपमहापौर कल्याणी अंपळकर, शिरपूरचे उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल, माजी आमदार डी. एस. अहिरे, महानगर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, ग्रामीण जिल्हाध्यक्ष नारायण पाटील यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. पोलिसांचा बंदोबस्त कायम होता.

टॅग्स :Dhuleधुळे