दुसाणे येथे लॉकडाऊनला प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:37 IST2021-03-27T04:37:30+5:302021-03-27T04:37:30+5:30
साक्री तालुक्यातील काही मोठ्या गावांमध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता तहसीलदारांनी लॉकडाऊन घोषित करण्याचे आदेश काही दिवसांपूर्वी काढले. त्यात ...

दुसाणे येथे लॉकडाऊनला प्रतिसाद
साक्री तालुक्यातील काही मोठ्या गावांमध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता तहसीलदारांनी लॉकडाऊन घोषित करण्याचे आदेश काही दिवसांपूर्वी काढले. त्यात दुसाणे गावाचादेखील समावेश आहे. दुसाने गावातील संपूर्ण व्यवसायिकांनी या बंदला पूर्णपणे प्रतिसाद दिला आहे.
परंतु, हा बंद नेमका कसा आहे? हे पाहण्यासाठी काही लोक बस स्टँड परिसरात विनामास्क फिरताना दिसून आले. अशा विनामास्क फिरणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करून, त्यांना त्यासंदर्भात दंड आकारावा, अशी मागणी गावातील ग्रामस्थ करीत आहेत. या बंदच्या कार्यकाळात वैद्यकीय सेवा पुरवणारे प्राथमिक आरोग्य केंद्र, खाजगी दवाखाने व मेडिकल संपूर्ण चालू राहतील. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रात ठरल्या वेळापत्रकाप्रमाणे कोरोना लसीकरण नियमितपणे चालू राहील, असे वैद्यकीय अधिकारी डॉ. आकडे यांनी सांगितले