बारापत्थर भागातील वाहतुकीचा प्रश्न सोडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 22:36 IST2019-06-19T22:35:35+5:302019-06-19T22:36:13+5:30

राष्ट्रवादी : पोलीस निरीक्षकांना निवेदन

Resolve traffic issues in Barapatner | बारापत्थर भागातील वाहतुकीचा प्रश्न सोडवा

dhule

धुळे : शहरातील बारापत्थर ते जेलरोड, तहसिल कार्यालय चौक नेहमी वर्तळीचा असतो़ वाहतुक शाखेकडून वाहतूकीचा प्रश्न सोडविण्यात यावा अशा मागणीचे निवेदन बुधवारी राष्ट्रवादी विद्यार्थी कॉग्रेस पक्षातर्फे वाहतुक निरीक्षकांना देण्यात आले़
शहरातील मध्यवर्ती ठिकाणी सकाळी व दुपारी नेहमी वाहतुकीचा प्रश्न निर्माण होतो़ त्यामुळे हा परिसर ब्लॉक झालेला असतो़ शहरातील बहूसंख्य नागरिकांचा वर्दळ तसेच तालुका पोलीस स्टेशन, बारा पत्थर भागात बस थांबा देखील याच भागात आहे़ हा रस्ता अरूंद असल्याने बस तेथे थांबल्यास वाहूकीची कोंडी निमाण होते़ वाहतुक शाखेकडून सदरील परिसरातील वाहतुकीचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली लावावा़ अशा मागणीचे निवेदन देण्यात आले़ निवेदनावर गौरव बोरसे, यशवर्धन कदमबांडे, लोकेश रणदिवे, कुणाल पाटील आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत़

Web Title: Resolve traffic issues in Barapatner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे