शहरासह परिसरात १५०० झाडे लावण्याचा संकल्प; शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त वृक्षारोपणाला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:23 IST2021-06-21T04:23:38+5:302021-06-21T04:23:38+5:30

या उपक्रमाला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हिलाल माळी यांच्या हस्ते प्रारंभ झाला. यावेळी शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख अतुल सोनवणे, गंगाधर माळी, महानगरप्रमुख ...

Resolution to plant 1500 trees in the area including the city; Tree planting started on the occasion of Shiv Sena's anniversary | शहरासह परिसरात १५०० झाडे लावण्याचा संकल्प; शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त वृक्षारोपणाला सुरुवात

शहरासह परिसरात १५०० झाडे लावण्याचा संकल्प; शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त वृक्षारोपणाला सुरुवात

या उपक्रमाला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हिलाल माळी यांच्या हस्ते प्रारंभ झाला. यावेळी शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख अतुल सोनवणे, गंगाधर माळी, महानगरप्रमुख मनोज मोरे, प्रफुल्ल पाटील, राजेंद्र पाटील, डाॅ. सुशील महाजन, युवासेनेचे जिल्हाप्रमुख पंकज गोरे, किरण जोंधळे, डाॅ. बी. बी. माळी, शिवराम आढावे, संजय गुजराथी, दीपाली चौधरी, नयना कुवर, संगीता जोशी, मनीषा शिंपी, आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी हरीश माळी, मोहित वाघ, स्वप्निल सोनवणे, दर्शन खंबायत, तुषार सातपुते, रोहित अमृतकर, कृष्णा मांडे, हर्षल सावंत, रवी बडगुजर, आनंद माळी, ऋषीकेश महाजन, हेमंत माळी, राम माळी, मंगला ठोंबरे, सरला वाघ, हेमलता गिरासे, रत्ना साळुंखे, विद्या सैंदाणे, सुनीता सैंदाणे, आदींसह पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले.

शिवसेनेचे ललित माळी यांच्या संकल्पनेतून ही मोहीम राबविली जात आहे. गेल्या सात वर्षांपासून ते मुलांचा वाढदिवस वृक्षारोपण करून साजरा करतात. त्यांनी आत्तापर्यंत एक हजार रोपे लावली आहेत. त्यात कडुनिंब, कदंब, बांबू, खैर, वड, पिंपळ, गुलमोहाेर, सप्तपर्णी, आदी वृक्षांचा समावेश आहे.

Web Title: Resolution to plant 1500 trees in the area including the city; Tree planting started on the occasion of Shiv Sena's anniversary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.