धुळे जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने मुख्यमंत्र्यांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 12:11 IST2018-12-26T12:10:56+5:302018-12-26T12:11:51+5:30

बोंड आळीचे अनुदान वाटपात अन्याय

Representation to the Chief Minister on behalf of Dhule District Congress Committee | धुळे जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने मुख्यमंत्र्यांना निवेदन

धुळे जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने मुख्यमंत्र्यांना निवेदन

धुळे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले.
निवेदनात बोंड आळीचे अनुदान वाटपात झालेला अन्याय, सुलवाडे जामफळ इंदूर मनमाड रेल्वे प्रकाश योजना त्वरित सुरू होणे तसेच महाराष्ट्रात जलद गतीने विकास व्हावा याकरिता काढण्यात आलेला शासन निर्णयात उत्तर महाराष्ट्रावर झालेला अन्याय, कैलासवासी धर्मा पाटील कुटुंबीयांना न्याय मिळणे तसेच धनगर कोळी मुस्लिम समाजाला त्वरित आरक्षण लागू करण्याची मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर मुख्यमंत्र्यांशी सविस्तर चर्चा झाली. वरील सर्व प्रकरणी राज्य सरकार लक्ष देईल असे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले याप्रसंगी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष शामकांत सनेर, नरेंद्र पाटील, किशोर पाटील,राजेंद्र देवरे,प्रकाश पाटील, रावसाहेब पवार, प्रवीण पवार उपस्थित होते.

Web Title: Representation to the Chief Minister on behalf of Dhule District Congress Committee

टॅग्स :Dhuleधुळे