धुळे शहरात जीर्ण विद्यृत तारा असल्याने नागरिकांना अडचणीला सामोरे जावे लागत आहे. नागरिकांना दर्जेदार व अखंडित वीज पुरवठा उपलब्ध करून द्यावा, अशा मागणीचे निवेदन आमदार फारुक शाह यांनी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांना दिले.
जीर्ण विद्युत तारा व विद्युत समस्यांना नागरिकांना गेल्या काही वर्षापासून सामोरे जावे लागत आहे. अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच विद्युत वितरण कंपनीची हानी रोखण्यासाठी वीज वितरण व्यवस्था मजबूत होणे गरजेचे आहे. शहरात वारंवार विद्युत प्रवाह खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे वीज वितरण अधिकारी व वीज ग्राहकांमध्ये वाद होतात. या पार्श्वभूमीवर धुळे शहरात वीज वितरण व्यवस्था अधिक कार्यक्षम होण्यासाठी विविध ठिकाणी वीज उपकेंद्र तयार करावे, नवीन वितरण रोहित्र बसविणे, वितरण रोहित्रांची क्षमता वाढविणे, जीर्ण तारा व पोल बदलविणे, कंडक्टर बदलविणे आदी विविध कामे करण्यासाठी निधीची तरतूद करावी, अशा आशयाचे निवेदन शहराचे आमदार फारुक शाह यांनी राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांची मुंबई मंत्रालय येथे भेट घेत दिले.