इंदिरानगर परिसरातील समाज मंदिर मंगल कार्यालयाची दुरुस्ती करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:34 IST2021-03-25T04:34:30+5:302021-03-25T04:34:30+5:30
गेल्या १५ ते २० वर्षांपूर्वी या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले होते. त्यानंतर आजपर्यंत तिथे फक्त विद्युत मीटर बसविण्याव्यतिरिक्त कुठलेही ...

इंदिरानगर परिसरातील समाज मंदिर मंगल कार्यालयाची दुरुस्ती करा
गेल्या १५ ते २० वर्षांपूर्वी या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले होते. त्यानंतर आजपर्यंत तिथे फक्त विद्युत मीटर बसविण्याव्यतिरिक्त कुठलेही काम झाले नाही. दुर्लक्षामुळे सदर इमारत आजच्या घडीला धोकादायक स्थितीत उभी आहे. त्या इमारतीकडे बघून नक्कीच इंदिरानगर, संजय नगर, वासीयांना हा प्रश्न उद्भवत असेल की आमच्या समस्या सोडवणार आहे का नाही.
आज कोरोनासारख्या महामारीच्या काळात शासनाने घालून दिलेल्या नियमावलीप्रमाणे ५० लोकांच्या उपस्थितीत समारंभ करणे बंधनकारक असताना गोरगरीब जनतेला हे कार्यालय म्हणजे त्यांच्यासाठी आधार आहे; पण त्याची झालेली दयनीय अवस्था बघून गोरगरिबांनाही त्याच्याकडे पाठ फिरविल्याशिवाय पर्याय शिल्ल्क राहिला नाही. स्लॅबला लागलेली गळती, स्वच्छतागृहांची हालत व इमारतीचे बांधकाम पडण्याची भीती या सर्व समस्या आहेत. तरी लोकप्रतिनिधींनी व पिंपळनेर ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांनी त्वरित लक्ष देऊन समाज मंदिर कार्यालयाची दुरुस्ती करावी, अन्यथा आपल्याला सामान्य गोरगरीब जनतेच्या रोषास सामोरे जावे लागेल, असे ब्रिक्स मानव अधिकार मिशन धुळे जिल्हा युवक अध्यक्ष महेश वाघ यांनी सांगितले.
याबाबतचे निवेदन सरपंच देविदास सोनवणे, ग्रामविकास अधिकारी डी. डी. चौरे, ग्रामपंचायत सदस्य योगेश बधान, सदस्य प्रमोद गांगुर्डे, सामाजिक कार्यकर्ते नासिर सय्यद यांना देताना ब्रिक्स मानव अधिकार मिशन धुळे जिल्हा युवक अध्यक्ष महेश वाघ, पिंपळनेर तालुका अध्यक्ष सुनील पवार, गौतम पवार, सुरेखाबाई सूर्यवंशी, कलाबाई शिंदे, पिलाबाई शिंदे, बाबा शेख, विजय कापडणी, विशाल साळुंखे उपस्थित होते.
Attachments area