अक्कलपाडाचे पाणी शिपाई धरणात सोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:41 IST2021-08-14T04:41:29+5:302021-08-14T04:41:29+5:30
धुळे तालुक्यात यावर्षी पावसाचे प्रमाण अत्यल्प असून, दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकरी हवालदिल झाला आहे. हे महाआघाडी सरकार ...

अक्कलपाडाचे पाणी शिपाई धरणात सोडा
धुळे तालुक्यात यावर्षी पावसाचे प्रमाण अत्यल्प असून, दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकरी हवालदिल झाला आहे. हे महाआघाडी सरकार शेतकऱ्यांना कोणतीही मदत करायला तयार दिसत नाही. आजच तालुक्यात पिण्याची पाण्याची टंचाई भासत असूनही यावर कुठल्याही उपाययोजना होताना दिसत नाहीत. या वर्षी पावसाचे पाणी कमी असल्याने पिण्याच्या पाण्याचे श्रोतही कमी झाले आहेत. त्यामुळे तालुक्याला पिण्याच्या पाण्यासाठी भविष्यात भटकंती करावी लागणार असल्याचे चित्र आजपासूनच दिसत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने यावर आतापासूनच नियोजन करून, भविष्यात होणाऱ्या पिण्याच्या पाण्याची टंचाई कशी दूर करता येईल, याचे नियोजन करावे, अशी मागणीही यावेळी राम भदाणे यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.
निमडाळे गावांत पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत आहे. सद्या ५-६ दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी आजच सदर गावाला भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे निम्न पांझरा अक्कलपाडा धरणाचे पाणी डाव्या कालव्याद्वारे निमडाळे येथील शिपाई धरणांत सोडून गावाचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न तातडीने सोडवावा, अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य राम भदाणे यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.