मालनगाव मध्यम प्रकल्पातून ६० दशलक्ष घनफूट पाणी सोडावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:34 IST2021-05-24T04:34:43+5:302021-05-24T04:34:43+5:30
जिल्हाधिकारी यादव यांनी म्हटले आहे, मालनगाव मध्यम प्रकल्पातील साक्री तालुक्यातील १६ गावांसाठी १३२.५७ दशलक्ष घनफूट आरक्षित आहे. पाणी सोडण्यासंदर्भात ...

मालनगाव मध्यम प्रकल्पातून ६० दशलक्ष घनफूट पाणी सोडावे
जिल्हाधिकारी यादव यांनी म्हटले आहे, मालनगाव मध्यम प्रकल्पातील साक्री तालुक्यातील १६ गावांसाठी १३२.५७ दशलक्ष घनफूट आरक्षित आहे. पाणी सोडण्यासंदर्भात संबंधित यंत्रणाचीही बैठक बोलविण्यात आली होती. या बैठकीत सर्व यत्रणांच्या शिफारशीनुसार मालनगाव मध्यम प्रकल्पातून पहिले आवर्तन, १६ गावांसाठी सोडण्यात येईल. या धरणातील पाणी साक्री तालुक्यातील गावांपर्यंत घेऊन जाण्याची जबाबदारी संबंधित ग्रामपंचायत, तहसीलदार, उपअभियंता (ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, पंचायत समिती), उपअभियंता वीज वितरण कंपनी, पोलीस निरीक्षक, उपअभियंता, पाटबंधारे विभाग, तलाठी/ ग्रामसेवक यांची संयुक्तरीत्या राहील. पाटबंधारे विभागाने त्यांच्या स्तरावर अधिकारी, कर्मचाऱ्यांचे पथक स्थापन करावे. या पथकाने नदी प्रवाहात अवैधरीत्या पाणी अडविणे, अवैधरीत्या पाणी उपसा करणाऱ्यांवर कार्यवाही करावी. पाणीपट्टीची रक्कम कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जिल्हा परिषद यांनी पाटबंधारे विभागास जमा करून घेऊन, त्यानंतरच पाणी सोडण्याची कार्यवाही करावी, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.