नातेवाईकांचा आक्रोश आणि रुग्णालयात झाली गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2019 12:40 IST2019-12-01T12:40:27+5:302019-12-01T12:40:54+5:30

विंचूर अपघात : चौघा गंभीर जखमींवर शर्थीचे होताय प्रयत्न

Relatives and relatives rushed to the hospital | नातेवाईकांचा आक्रोश आणि रुग्णालयात झाली गर्दी

नातेवाईकांचा आक्रोश आणि रुग्णालयात झाली गर्दी

धुळे : धुळे तालुक्यातील बोरी नदी पुलावरुन बीडकडे मजुरांना घेऊन जाणारे व्हॅन उलटले़ अपघाताची ही घटना घडल्यानंतर स्वत:ला सावरत जखमींपैकी कोणीतरी आपल्या मध्यप्रदेशातील नातलगांना घटनेची माहिती दिली़ 
लागलीच शनिवारी सकाळी जखमींच्या नातेवाईकांनी रुग्णालयात गर्दी केली़ मयत आणि गंभीर जखमींना पाहताच त्यातील काहींनी हंबरडा फोडला़ हे पाहून अनेकांना गहिवरुन आले़ गुळाची भेली तयार करण्याचे काम बीड येथे होत असल्याने मजूर घेऊन जाणे आणि त्यांना काम झाल्यावर त्यांच्या गावाला सोडून देण्याचे काम नियमितपणे केले जात असते़ नेहमी प्रमाणे काम असल्यामुळे मजुर आपल्या परिवारासह हसतमुख निघाले़ त्यांच्या गावात असलेले त्यां
चे वयोवृध्द नातलग आणि मित्र परिवार गावातच राहिले़ व्हॅन नदीत कोसळून आपला परिवार नाहीसा होईल असे कोणालाही वाटत नव्हते़ मात्र शनिवारची रात्र त्यांच्यासाठी काळी ठरली़ जीवलगाचा मृत्यू ओढवला असे समजताच धवल्या व धवल्यागिर गावात दु:खाचे सावट कोसळले़ पुना बारेला, राकेश बारेला, नवलसिंग बारेला, हिरालाल बारेला, बालुसिंग बारेला, भुरेलाल बारेला धुळ्याकडे धाव घेतली़ 
जखमींवर शर्थीचे होताय प्रयत्न
तालुक्यातील बोरी-कानोली नदीवरील पुलावरुन पिकअप व्हॅन खाली कोसळल्याने ४ जणं गंभीर जखमी झाले तर १९ जणांना दुखापत झाली़ त्या सर्वांवर हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरु आहेत़ गंभीर जखमी झालेल्यांमध्ये प्रामुख्याने रेलबाई उर्फ रेखा सेवासिंग बारेला (१८) या तरुणीला कमरेला आणि छातीला मार लागला आहे़ रंध्या तुफानसिंग बारेला (१४) या मुलाला डाव्या डोळ्याजवळ मोठी दुखापत झाली आहे़ शिवाय  डोक्यास किरकोळ दुखापत झाली़ राजेश तुफानसिंग बारेला (१०) या मुलाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे़ भुरुबाई तुफानसिंग बारेला (३) या चिमुकलीला डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे़ या सर्वांच्या प्रकृतीत किमान सुधारणा व्हावी यासाठी डॉक्टरांचे पथक आणि त्यांच्या सोबतचे सहकारी शर्थीचे प्रयत्न करीत आहेत़ 
जखमींमध्ये पुरुष महिलांसह सहा चिमुकल्यांचाही सहभाग
या अपघातात ४ पुरुष, ३ महिला, ६ मुले, ६ मुली असे एकूण १९ जणांचा समावेश आहे़ जखमींमध्ये देवलसिंग सुरजी बारेला, दुना रेवलसिंग बारेला, सेवासिंग नवलसिंग बारेला, रुना देवलसिंग बारेला, गांजुबाई रेवलसिंग बारेला, लेदाराम गरदान आर्य, सेवाबाई लेदाराम आर्य, तुफानसिंग मालसिंग बारेला, मोखनी हिरालाल पावरा, हिरालाल अबु पावरा, उर्मिला हिरालाल पावरा, बुनाबाई रेवसिंग बारेला, धरमसिंग सेवासिंग बारेला, बाबुलाल रेवलसिंग बारेला, सुरेश तुफानसिंग बारेला, सुरजबाई तुफानसिंग बारेला, रोहिताबाई तुफानसिंग बारेला, लालसिंग रेवलसिंग बारेला, शिलट्या रेवलसिंग बारेला यांना अपघातात दुखापत झाली आहे़ हे सर्व धवलगिरी ता़ सेंधवा जि़ बडवानी (मध्यप्रदेश) येथील रहिवाशी आहेत़ त्यांच्यावर हिरे वैद्यकीय महाविद्यालयात वैद्यकीय उपचार सुरु आहेत़ 
वरिष्ठ पोलीस अधिकाºयांकडून जखमींची विचारपूस
धुळे तालुका पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली़ माहिती मिळताच अपघात लहान आणि मोठा याची पर्वा न करता धुळे तालुका पोलीस निरीक्षक दिलीप गांगुर्डे, चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक कोडपे, पोलिसांच्या दरोडा पथकाचे गायकवाड, महामार्ग आणि होमगार्ड यांनी घटनास्थळी तातडीने दाखल होऊन मदतकार्य केले़ मदतीसाठी सरसावल्याने जखमींना हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले़ त्यांच्या पाठोपाठ अपर पोलीस अधीक्षक डॉ़ राजू भुजबळ यांनीही घटनास्थळी भेट दिली होती़ त्यांनी घटना कशी घडली, प्राथमिक कारण काय असू शकेल याची स्पॉट जवळ जावून पाहणी केली़ सर्वात शेवटी उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाºयांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली़ महामार्गावरील वाहतुकीचा धावता आढावा घेतला़

Web Title: Relatives and relatives rushed to the hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.