अंजना हॉस्पिटलमध्ये तीन रूग्णांचा मृत्यू, अॉक्सीजन अभावी मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 15:16 IST2021-03-29T15:13:01+5:302021-03-29T15:16:48+5:30
जिल्हाधिकाऱ्यांनी दिले चौकशीचे आदेश

अंजना हॉस्पिटलमध्ये तीन रूग्णांचा मृत्यू, अॉक्सीजन अभावी मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप
अंजना हॉस्पिटलमध्ये तीन रूग्णांचा मृत्यू, अॉक्सीजन अभावी मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप जिल्हाधिकाऱ्यांनी दिले चौकशीचे आदेश धुळे - येथील साक्री रोड परिसरातील अंजना हार्ट हॉस्पिटलमध्ये तीन कोरोना बाधित रूग्णांचा मृत्यू झाला. अॉक्सीजन अभावी रूग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. रूग्ण गंभीर परिस्थितीत दाखल झाले होते. पुरेसे अॉक्सीजन सिलींडर उपलब्ध आहेत. व्हेंटीलेटर उपलब्ध नसल्याचे नातेवाईकांना सांगितले होते असे रूग्णालयाचे डॉ. दिपक शिंदे यांचे म्हणणे आहे. नातेवाईकांचा आरोप चुकीचा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तर जिल्हाधिकारी संजय यादव यांनी मनपा आयुक्तांना चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. अंजना हार्ट हॉस्पिटलमध्ये दोन दिवसात तीन रूग्णांचे मृत्यू झाले आहेत. रविवारी संद्याकाळी ६ वाजता एका रूग्णाचा मृत्यू झाला. रात्री एक वाजता व सोमवारी सकाळी १० वाजता आणखी एक रूग्ण दगावला आहे. मृतांमध्ये धुळे शहरातील दोन व धुळे तालुक्यातील एका रूग्णाचा समावेश आहे. मृतांच्या नातेवाईकांशी संपर्क होऊ शकला नाही. रूग्णांचे अॉक्सीजन ३० पर्यंत कमी झाले होते. रूग्णालयात व्हेंटीलेटर शिल्लक नसल्याचे नातेवाईकांना सांगितले होते, मात्र त्यांनी दाखल करून घ्या असे सांगितले. रूग्णालयात पुरेसे अॉक्सीजन सिलींडर उपलब्ध आहेत. रूग्ण दाखल झाले त्यावेळीच त्यांची प्रकृती नाजूक होती. नातेवाईकांचा आरोप चुकीचा आहे. - डॉ. दिपक शिंदे, अंजना हार्ट हॉस्पिटल