दोन्ही पदासाठी दोन उमेदवारी अर्ज आल्याने निवडणूक घेण्यात आली. तीत ९ विरुद्ध २ मतांनी रेखा पवार आणि गोकूळ बेडसे यांचा विजय झाला. सभेला सीमा दिनेश ठाकरे, पंडित आसाराम पाटील, नानाभाऊ टूला भिल, इंदूबाई विक्रम भिल, संगीता विठ्ठल पाटील, जण्याबाई रमेश मोरे, आणि सरला शिवराम सोनवणे हे भाजपचे तर दिनेश बाळू देवरे व योगिता समाधान शेवाळे, हे विरोधी सदस्य उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पिंगळे यांनी काम पाहिले तर तलाठी सुभाष कोकणी, व ग्रामसेवक भारती गवळी यांनी सहायक म्हणून काम पाहिले.
विजयी झाल्यानंतर सरपंच आणि उपसरपंच यांच्यासह भाजपच्या सर्व सदस्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पॅनल प्रमुख पं.स. सदस्य दगाजी देवरे,नथ्थू गोकूळ पवार, साहेबराव पवार, दिनेश ठाकरे, निंबा चव्हाण, देवीदास चव्हाण यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.