शहराने परत दिली भाजपला साथ,काँग्रेस आणि राष्टÑवादी आघाडीला परत धुळेकरांनी नाकारले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 22:00 IST2019-05-23T21:56:41+5:302019-05-23T22:00:55+5:30
डॉ.सुभाष भामरे यांना मतदारसंघातून २८ हजार ६५२ मतांचा लिड दिला.

dhule
राजेंद्र शर्मा।
धुळे : मतदारसंघातील माजी आमदार अनिल गोटे यांनी पक्षाशी बंडखोरी करुन लोकसंग्रामतर्फे उमेदवारी केली होती. त्यांच्या उमेदवारीचा भाजपा उमेदवार डॉ.सुभाष भामरे यांना फटका बसेल असे वाटत होते. सुरुवातीला अनिल गोटे यांनीही आपली उमेदवारी ही भाजप उमेदवाराला पराभूत करण्यासाठी असल्याची घोषणा केली होती. नंतर त्यांनी उमेदवारी ही जिंकण्यासाठी असल्याचे सांगितले. त्यामुळे गोटे यांच्या उमेदवारीचा फटका भाजपला किती बसतो, याकडे सर्वांचे लक्ष लागून होते.
दुसरीकडे दुसरीकडे काँग्रेस - राष्टÑवादी आघाडीचे सर्वच नेते एकजुटीने प्रचार करीत असल्याने यंदा धुळे शहरातून काँग्रेसला चांगली मते मिळतील अशी अपेक्षा होती. तसेच मुस्लिम मतेही मिळतील असे चित्र होते. निवडणुकीत मतदारसंघात सर्वात कमी मतदान झाले होते. त्यामुळे मुस्लिम मतांच्या जोरावर काँग्रेस येथून जास्त मते मिळवू शकते, अशीही शक्यता वर्तविण्यात येत होती.
परंतु या शक्यता आणि चर्चा पोल ठरल्याचे निकाल जाहीर झाल्यानंतर स्पष्ट झाले. कारण मतदारसंघातून डॉ.भामरे यांना सर्वाधिक मते मिळाली. दुसरीकडे माजी आमदार अनिल गोटे यांना मात्र ३ हजार ७२० एवढीच मते मिळाली. निवडणुकीत गोटे यांची अनामत रक्कमही जमा झाली आहे. एकूणच अनिल गोटे यांच्या उमेदवारीचा कुठलाही प्रभाव निवडणुकीत दिसून आला नाही.
दुसरीकडे काँग्रेस - राष्टÑवादी आघाडीचे उमेदवार कुणाल पाटील यांनाही फक्त ५७ हजार ३२२ मते मिळाली.वंचित बहुजन आघाडीचे उमेदवाराने काँग्रेसची मते घेतली. त्यांच्या उमेदवारीचा फटका निश्चितच कॉंग्रेसला बसला.
एकूणच महापालिकेनंतर या निवडणुकीत सुद्धा काँग्रेस - राष्टÑवादी आघाडी स्पेशल फेल ठरली. दोन्ही पक्षाचे नेते एकत्र प्रचार करीत असले तरी त्याचा फायदा काँग्रेस उमेदवाराला मिळालाच नाही. म्हणजेच काँग्रेस - राष्टÑवादीचे मनोमिलन हे महापालिका निवडणुकीप्रमाणे यंदाही केवळ कागदावर आणि प्रचारापुरता एकत्र दिसत होते का, असा प्रश्नही आता उपस्थित होत आहे.
धुळे शहर धुळे शहर विधानसभा मतदारसंघात माजी आमदार अनिल गोटे यांच्या उमेदवारीने भाजपाला फटका बसण्याची शक्यता ठरली पोल, भाजपाने येथूनही २८ हजाराचे मताधिक्य घेतले, निवडणुकीत गोटे यांची अनामतही झाली जप्त