लोकमत प्रभाव. तालुका कृषी अधिकाऱ्यांनी केली पिकांची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:42 IST2021-09-17T04:42:55+5:302021-09-17T04:42:55+5:30

मालपूरसह संपूर्ण परिसरात सध्या शेतकऱ्यांचे पांढरे सोने समजला जाणारा कापूस लाल, तर नगदी कांदा पिकाची पात पिळून वाफे बसण्याचे ...

Referendum effect. Taluka Agriculture Officer inspected the crops | लोकमत प्रभाव. तालुका कृषी अधिकाऱ्यांनी केली पिकांची पाहणी

लोकमत प्रभाव. तालुका कृषी अधिकाऱ्यांनी केली पिकांची पाहणी

मालपूरसह संपूर्ण परिसरात सध्या शेतकऱ्यांचे पांढरे सोने समजला जाणारा कापूस लाल, तर नगदी कांदा पिकाची पात पिळून वाफे बसण्याचे प्रमाणात या आठवड्यात मोठी वाढ झाली आहे. यासंदर्भात ‘लोकमत’ने १३ सप्टेंबर रोजी शेतकऱ्यांचे पांढरे सोने मातीमोल तर ‘लाल्या रोगामुळे लावलेला खर्च ही निघणे मुश्कील’ या मथळ्याखाली शेतकऱ्यांच्या व्यथा सविस्तर मांडून विषयाला वाचा फोडली, यावर कृषी विभागाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे, असेदेखील आवाहन केले होते. त्याची दखल घेत शिंदखेडा तालुका कृषी अधिकारी विनय बोरसे यांनी मालपूर, कलवाडे, चुडाणे रोड आदी शेतशिवारात शेत बांधावर जाऊन कापूस व कांदा पिकाची पाहणी केली. यावेळी त्याच्या समवेत. दोंडाईचा मंडल कृषी अधिकारी नवनाथ सांबळे. कृषी पर्यवेक्षक एच. पी. बाविस्कर आदी उपस्थित होते.

अतिवृष्टी व गेल्या महिन्याभरापासून आभाळ झाकलेले आहे. पुरेशा प्रमाणात पिकांना सूर्यप्रकाश मिळत नाही. जमिनीत ओलावा कायम असल्याने जमिनीतील बुरशीचे प्रमाण वाढल्यामुळे या रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. यासाठी शेतकऱ्यांनी घाबरून न जाता कांदा पिकावर झेड ७८, १९.१९.१९. स्टिकरसह दाट फवारणी तसेच पाच ते सात दिवसांनी एन्ट्राकालची दुसरी फवारणी करावी तर कापसावर १३.०.४५. दोन किलो शंभर लिटर पाण्यातून एकरी दोनशे ते अडीचशे लिटर पाण्याची फवारणी करावी. यामुळे रोगांचा प्रादुर्भाव कमी होईल असे सांगितले.

यावेळी त्यांनी शास्त्रज्ञांशी प्रत्यक्ष मोबाइलवरून शेतकऱ्यांचे बोलणेदेखील करून दिले. हवामानातील बदलामुळे पिकांची अशी परिस्थिती झालेली दिसुन येत आहे. यावेळी शेतकरी किसन खलाणे, नंदलाल पाकळे, काशिनाथ अहिरे, विक्रेते प्रशांत आडगाळे पत्रकार रवींद्र राजपूत आदींसह मोठ्या संख्येने शेतकरी वर्ग यावेळी उपस्थित होता.

160921\20210915_171607.jpg~160921\20210915_171603.jpg~160921\20210915_165133.jpg

फोटो :- मालपूर येथील मौजे कलवाडे शिवारात शेत बांधावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना तालुका कृषी अधिकारी विनय बोरसे, यांच्या समवेत नवनाथ साबळे, एस. पी. बाविस्कर, शेतकरी किसन खलाणे, काशिनाथ अहिरे, नंदलाल पाकळे, प्रशांत आडगळे, पत्रकार रवींद्र राजपूत, आदी उपस्थित मान्यवर.~फोटो. दोन~मालपूर येथील तेले शिवारात कांद्याची पाहणी करतांना तालुका कृषी अधिकारी विनय बोरसे नवनाथ साबळे

Web Title: Referendum effect. Taluka Agriculture Officer inspected the crops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.