बचत गटांकडून होणारी वसुली थांबवावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:30 IST2021-05-03T04:30:41+5:302021-05-03T04:30:41+5:30

महिला बचत गटातील महिलांना कोरोना काळात बचत गटातून रोजगारनिर्मिती होत नसल्यामुळे खासगी फायनान्स कंपनीमार्फत दिलेले कर्जाचे हप्ते बचत गटातील ...

Recovery from self-help groups should be stopped | बचत गटांकडून होणारी वसुली थांबवावी

बचत गटांकडून होणारी वसुली थांबवावी

महिला बचत गटातील महिलांना कोरोना काळात बचत गटातून रोजगारनिर्मिती होत नसल्यामुळे खासगी फायनान्स कंपनीमार्फत दिलेले कर्जाचे हप्ते बचत गटातील महिलांना कोरोना काळात परतफेड करणे शक्य होत नाही. तरीदेखील खाजगी फायनान्स कंपन्यांमार्फत महिला बचत गटांकडून बळजबरीने हप्ते वसुली करण्यात येत आहे. तरी ही कर्ज वसुली जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश देऊन त्वरित थांबवावी व महिला बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी मदत करावी, अशी मागणी भाजपच्या महिला तालुकाध्यक्षा माधुरी सिसोदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून लवकरच तोडगा काढण्यासाठी बचत गटांना दिलासा देण्यासाठी योग्य ते सहकार्य करण्याचे आश्वासन मा.मंत्री आ.जयकुमार यांनी दिले आहे.

Web Title: Recovery from self-help groups should be stopped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.