बचत गटाच्या महिलांकडे वसुलीचा तगादा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 20:37 IST2020-05-19T20:36:50+5:302020-05-19T20:37:12+5:30

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : मायक्रो फायनान्स कंपनीचे कर्ज माफ करण्याची मागणी

Recovery petition to the women of the self-help group | बचत गटाच्या महिलांकडे वसुलीचा तगादा

dhule

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : बचत गटातील महिलांना कर्जपुरवठा करणाºया एका खाजगी मायक्रो फायनान्स कंपनीने लॉकडाउनमधे वसुलीचा तगादा लावला असल्याने कंटाळलेल्या महिलांनी मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेत कर्ज माफ करण्याची मागणी केली़
खाजगी मायक्रो फायनान्स कंपनीकडून बचत गटाचे कर्ज घेणाºया महिलांनी मुगळवारी जिल्हाधिकाºयांची भेट घेवून निवेदन दिले़
निवेदानात म्हटले आहे की, मायक्रो फायनान्स कंपनीकडून घेतलेल्या कर्जाचे काही हप्ते फेडले आहेत़ परंतु सध्या लॉकडाउन असल्याने हाताला काम नाही़ उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे़ अशा परिस्थितीत बचत गटाचे कर्ज फेडायचे कसे अशी चिंता सतावत आहे़ बचत गटातील महिला अतीशय साधारण आर्थिक परिस्थिती असलेल्या कुटूंबातील असल्याने पुढील हप्ते फेडणे शक्य नाही़ परंतु मायक्रो फायनान्स कंपनीकडुन वसुलीसाठी सातत्याने तगादा सुरु आहे़ कोणत्याही परिस्थितीत हप्ते भरावेच लागतील, दंडही भरावा लागेल अशा पध्दतीने धमकावले जात असल्याचा आरोप या महिलांनी निवेदनात केला आहे़
मायक्रो फायनान्स कंपनीने वसुलीचा तगादा लावल्याने आमचे जीवन विस्कळीत झाले आहे़ त्यामुळे या गंभीर समस्येसंदर्भात शासनाशी संवाद साधून न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी या महिलांनी केली आहे़
निवेदनावर नयना जितेंद्र सोनवणे, मनिषा अहिरराव, आशा अहिरराव, कल्पना मिस्तरी, बनाबाई भोई, पल्लवी अहिरराव, योगिता भडागे, नम्रता मराठे, अनिता मराठे, शैनाज खान, भारती सरोदे, संगिता लहामगे, अनिता शेलार, सुरेखा चौधरी, जयश्री चौधरी, कल्पना चौधरी, रुपाली मारवाडी, माधुरी अहिरराव, रंजना मराठे, उमा मराठे, पूनम भोई, कल्याणी सोनवणे, वैशाली कापडे, पूनम लहामगे, कल्पना वालतुले, उषा चौधरी, उषा शिरुडे, शारदा परदेशी, शारदा सोनवणे आदी महिलांच्या सह्या आहेत़

Web Title: Recovery petition to the women of the self-help group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे