महाआवास अभियानांतर्गत लाभार्थ्यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:39 IST2021-08-19T04:39:31+5:302021-08-19T04:39:31+5:30

पंचायत समितीत झालेल्या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे माजी सदस्य कामराज निकम, जिल्हा परिषद उपाध्यक्ष कुसुम निकम, पंचायत समिती सभापती ...

Reception of beneficiaries under Mahaavas Abhiyan | महाआवास अभियानांतर्गत लाभार्थ्यांचा सत्कार

महाआवास अभियानांतर्गत लाभार्थ्यांचा सत्कार

पंचायत समितीत झालेल्या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे माजी सदस्य कामराज निकम, जिल्हा परिषद उपाध्यक्ष कुसुम निकम, पंचायत समिती सभापती वैशाली पाटील, उपसभापती नारायणसिंग गिरासे, जिल्हा परिषदेचे सदस्य वीरेंद्रसिंग गिरासे, ज्योती बोरसे, संजीवनी सिसोदे, पंचायत समितीचे माजी सभापती जिजाबराव सोनवणे, डी. आर. पाटील, जी. डी. पाटील नगरपंचायत गटनेते अनिल वानखेडे, गटविकास अधिकारी संजय सोनवणे, सहायक गटविकास अधिकारी मानसिंग वळवी, विजयसिंग गिरासे उपस्थित होते

आवास योजना व त्यातील विजेते लाभार्थी असे

प्रधानमंत्री आवास योजना- प्रथम मालपूर ग्रामपंचायत,द्वितीय सुराय, तर तृतीय बेटावद ग्रामपंचायत.

प्रधानमंत्री आवास योजना उत्कृष्ट लाभार्थी- प्रथम संदीप रामराव माळी बाह्मणे, द्वितीय गोपीचंद चैत्राम पाटील धामणे, तृतीय कैलास हिरामण माळी, बेटावद.

राज्य पुरस्कृत आवास योजना- प्रथम डांगुर्णे, द्वितीय मालपूर, तर तृतीय बेटावद.

राज्य पुरस्कृत आवास योजनेअंतर्गत सर्वोत्कृष्ट घरकुल - प्रथम : वसंत तुकाराम महाले, वरसूस, द्वितीय : प्रियदर्शन काशीनाथ बागले, ब्राह्मणे, तृतीय : जिजाबाई भगवान अहिरे साळवे.

सर्वोत्कृष्ट क्लस्टर अभियंता सचिन पाटील व अभियंता श्याम पाटील यांचा आमदार जयकुमार रावल यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

Web Title: Reception of beneficiaries under Mahaavas Abhiyan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.