डॉ.पी.एस. गिरासे यांनी राष्ट्रमाता जिजाऊ यांचा इतिहास, त्यांची कौशल्ये, मातृत्व आणि स्वराज्य निर्मिती, यात जिजाऊ यांचा सहभाग याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. छत्रपती शिवाजी महाराजांना घडवताना आणि त्यांच्यावर संस्कार करताना जिजामातांनी त्यांना कर्तव्याबरोबरच राजनीती देखील शिकवली. न्याय करताना समान करावा आणि अपराध करणाऱ्याला कठोर शासन करावे हे देखील त्यांनी संस्कारातून शिकवले. तसेच हिंदवी स्वराज्याची संकल्पना त्यांनी महाराजांकरवी पूर्ण करून घेतली आणि त्याकरिता त्यांनी तसे संस्कारांचे बीज महाराजांमध्ये पेरले. महाराज देखील आईच्या सर्व आदेशांना जागले आणि म्हणून हिंदवी स्वराज्य प्रत्यक्षात अवतरले, असे विचार त्यांनी मांडले.
प्राचार्य डॉ.डी.आर. पाटील यांनीही विचार मांडले. याप्रसंगी उपप्राचार्य डॉ.ए.एम. पाटील, डॉ.आर.डी. जाधव, समिती सदस्य डॉ.आर.एस. पवार उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समन्वयक डॉ.ज्योती महाशब्दे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ.अनिता जाधव केले. परिचय प्रा.सपना येशी यांनी करून दिला. आभार प्रा.शुभांगी पिंगळे यांनी मानले.