शिंदखेड्यात रवी आॅइल किराणा दुकान फोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 13:09 IST2018-06-02T13:09:17+5:302018-06-02T13:09:17+5:30

१७ हजार  रोख लंपास : पोलिसांसमोर चोरट्यांना पकडण्याचे आव्हान

The Ravi-oil grocery store was opened in Shindkhed | शिंदखेड्यात रवी आॅइल किराणा दुकान फोडले

शिंदखेड्यात रवी आॅइल किराणा दुकान फोडले

ठळक मुद्देशिंदखेड्यातील दुकानात घरफोडी१७ हजाराची रोकड लंपासचोरट्याचा शोध लावण्याची मागणी

शिंदखेडा : येथील बस स्थानकासमोरील  रवी आॅइल अँड प्रोव्हिजन  या  किराणा दुकानाचे कुलूप टॅमीने तोडून १७ हजार रोख लंपास केल्याची घटना घडली़ अद्यापपावेतो चोरट्याला पकडण्यात आलेले नाही़ त्यामुळे नागरीकांनी नाराजी दर्शविली आहे़ 
बसस्थानकासमोर रवी आॅइल किराणाचे मालक सुनील वाधवा हे नेहमी प्रमाणे गुरुवारी रात्री दुकान बंद करुन घरी गेले़ शुक्रवारी पहाटे ६ वाजेच्या सुमारास  याच कॉम्प्लेक्समध्ये व्यवसाय करत असलेल्या हरीश जाधव यांना या दुकानाचे शेटर अर्धवट उघडे दिसले़ दुकानाला लावलेले कुलूप व टॅमी बाहेर पडलेली दिसली़ त्यांनी ही बाब दुकानाचे मालक सुनील वाधवा यांना दूरध्वनी करून सांगितली़ वाधवा दुकानात आले असता दुकानातील सामान व गल्यामधील बील अस्ताव्यस्त पडलेली तसेच गल्यातील सुमारे १७ हजार चोरीस गेल्याचे  निदर्शनात आले़ याबाबत शिंदखेडा पोलिसात त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चोरट्याविरुद्ध  गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ 

Web Title: The Ravi-oil grocery store was opened in Shindkhed