रेशन दुकानदार धान्य देत नाही; हजारो कुटुंबांनी दुकानच बदलून टाकले जिल्ह्यात १० हजार ७१५ रेशनकार्डधारकांनी घेतला पोर्टेबिलिटीचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:44 IST2021-07-07T04:44:44+5:302021-07-07T04:44:44+5:30

जिल्ह्यात रेशन दुकान बदलविणाऱ्या कुटुंबांची संख्या मोठी असली तरी सर्वच दुकानदार त्रास देतात असा त्याचा अर्थ होत नाही. काही ...

The ration shopkeeper does not give grain; Thousands of families change shops 10 thousand 715 ration card holders in the district take advantage of portability | रेशन दुकानदार धान्य देत नाही; हजारो कुटुंबांनी दुकानच बदलून टाकले जिल्ह्यात १० हजार ७१५ रेशनकार्डधारकांनी घेतला पोर्टेबिलिटीचा लाभ

रेशन दुकानदार धान्य देत नाही; हजारो कुटुंबांनी दुकानच बदलून टाकले जिल्ह्यात १० हजार ७१५ रेशनकार्डधारकांनी घेतला पोर्टेबिलिटीचा लाभ

जिल्ह्यात रेशन दुकान बदलविणाऱ्या कुटुंबांची संख्या मोठी असली तरी सर्वच दुकानदार त्रास देतात असा त्याचा अर्थ होत नाही. काही कुटुंबे कामानिमित्त स्थलांतरित झालेली असतात. गावी जाऊन धान्य घेणे त्यांना शक्य नसल्याने ही कुटुंबे आता ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणी धान्य घेऊ लागले आहेत.

दिव-दमनसह इतर राज्यांमध्येही मिळाले धान्य

रोजीरोटीसाठी गाव सोडून गेलेल्या जिल्ह्यातील ८१ स्थलांतरीत मजूर कुटुंबांना इतर राज्यांमध्ये पोर्टेबिलिटीमुळे धान्य मिळाल्याने या कुटुंबांचा पोटाचा प्रश्न सहज सुटला. दिव-दमनमध्ये २३ कुटुंबांना, गुजरात राज्यात ५७ तर मध्यप्रदेशमध्ये एका कुटुंबाला पोर्टेबिलिटीच्या सुविधेमुळे धान्य मिळाले आहे.

पोर्टेबिलिटीची तालुकानिहाय आकडेवारी अशी

धुळे : ६,८१९

साक्री : १,४५६

शिंदखेडा : १,५७८

शिरपूर : ८६२

ग्रामीण भागापेक्षा शहरात सर्वाधिक

रेशनकार्ड पोर्टेबिलिटीचा लाभ घेणारी कुटुंबे ग्रामीणपेक्षा शहरी भागात सर्वाधिक आहेत. धुळे तालुक्यात तब्बल ८ हजार ८१९ कुटुंबांनी याचा लाभ घेतला असून त्यात धुळे शहरातील कार्डधारकांची संख्या जास्त आहे. खेडेगावांमध्ये केवळ एकच दुकान असते. मोठे गाव असले तर दोन दुकाने असतात. त्यामुळे ग्रामीण नागरिकांना या सुविधेचा लाभ घेणे तितक्या सोयीचे ठरत नाही.

नोव्हेंबरपर्यंत मोफत धान्य

कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी दुसऱ्या लाटेतील कठोर निर्बंधांमुळे रोजी बंद झाली असली तरी रोटी बंद होऊ नये यासाठी मे आणि जून महिन्याचे नियमित धान्यासह राज्य सरकार आणि केंद्र सरकारने मोफत धान्य दिले. पंतप्रधान गरीब कल्याण योजनेचे मोफत धान्य वाटपाची मुदत शासनाने नोव्हेंबरपर्यंत वाढवली आहे. त्यामुळे पात्र रेशनकार्डधारकांना नोव्हेंबर महिन्यापर्यंत नियमित धान्यासह मोफत धान्यदेखील मिळणार आहे. मे महिन्याचे धान्य वाटप झाले आहे. जूनचे नियमित धान्य ९० टक्के आणि मोफत धान्य ८० टक्क्यांपर्यंत वाटप झाले असून अजूनही वाटप सुरूच आहे. त्यामुळे रेशन दुकानांवर गर्दी होत आहे.

Web Title: The ration shopkeeper does not give grain; Thousands of families change shops 10 thousand 715 ration card holders in the district take advantage of portability

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.