धुळयातील साक्री पिंपळनेर रस्त्यावर रास्तारोको, जाळपोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2018 11:48 IST2018-08-09T11:46:42+5:302018-08-09T11:48:13+5:30

मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन, तणावपूर्ण स्थिती

Ratharoko, arson on Smoky Sakri Pimpalner road | धुळयातील साक्री पिंपळनेर रस्त्यावर रास्तारोको, जाळपोळ

धुळयातील साक्री पिंपळनेर रस्त्यावर रास्तारोको, जाळपोळ

ठळक मुद्दे-साक्री-पिंपळनेर मार्गावर रास्तारोको, जाळपोळ-रास्तारोकोमुळे वाहतूक प्रभावित-मराठा क्रांती मोर्चातर्फे जोरदार घोषणाबाजी

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : महाराष्ट्र मराठा क्रांती मोर्चा समन्वय आज महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला आहे़ या बंददरम्यान साक्री-पिंपळनेर रस्त्यावर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने रास्तारोको करण्यात आला़ तसेच रस्त्यावर टायर जाळत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली़
महाराष्ट्रात मराठा क्रांती मोर्चाने आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे़ त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सर्वत्र कडकडीत बंद पाळण्यात येत आहे़ या बंद दरम्यान साक्री-पिंपळनेर रस्त्यावर क्रांती मोर्चातर्फे रास्तारोको करण्यात आला़ तसेच टायर जाळत घोषणाबाजी करण्यात आली़ त्यामुळे तणाव निर्माण झाला होता़ काहीकाळ वाहतूकही ठप्प झाली होती़ घटनास्थळी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे़ 


 

Web Title: Ratharoko, arson on Smoky Sakri Pimpalner road