बाजार समितीजवळ रास्तारोको आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 21:43 IST2020-12-15T21:42:39+5:302020-12-15T21:43:00+5:30
बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी आक्रमक

dhule
धुळे : दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्याची मागणी करीत बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी आणि गर्जना संघटनेतर्फे धुळ्यातील बाजार समितीजवळ आक्रमक आंदोलन करुन रास्तारोको केला. त्यामुळे ऐन बाजाराच्या दिवशी वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.
देशातील शेतकऱ्यांच्या मागण्या फेटाळून केंद्र सरकारने असंवेदनशिल चेहरा उघड केला आहे. त्यामुळे पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. डाॅ. माने यांच्या सुचनेवरुन धुळ्यात हे आंदोलन करण्या४त आले.
आंदोलनात पार्टीचे महाराष्ट्र प्रमुख आनंद लोंढे, व्यापारी आघाडी अध्यक्ष जितू जगताप, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष भालचंद्र सोनगत, धुळे जिल्हाध्यक्ष विजय सावकारे, जिल्हा संघटक महेंद्र पाटील, वकील आघाडीचे जिल्हाध्यक्ष विनोद वाघ, वाहतूक आघाडीचे दीपक पाटील, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा सुरेखा दीपक पाटील, शहराध्यक्षा संगीता गुलाबराव पाटील, सलीम शिकलीकर, इम्रान पठाण, प्रविण पाटील, मोहन शिंदे, अविनाश पाटील, दिनेश गांगुर्डे, नईम हिरो यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.