विविध संघटनांतर्फे आज रॅलीचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2019 22:04 IST2019-12-27T22:03:38+5:302019-12-27T22:04:14+5:30
शिरपूर : नागरी सुधारणा कायदा समर्थन

Dhule
शिरपूर : नागरी सुधारणा कायद्याला समर्थन देण्यासाठी विविध संघटनेतर्फे रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे़
२७ रोजी दुपारी २ वाजता येथील बसस्टॅण्डजवळील किसान विद्या प्रसारक संस्थेच्या कार्यालयापासून रॅली काढली जाणार आहे़ सदर रॅली मेनरोड मार्गाने प्रांत कार्यालयापर्यंत काढली जाणार आहे़ त्यानंतर प्रांताधिकाऱ्यांना निवेदन दिले जाईल.
रॅलीत वकील, डॉक्टर, इंजिनिअर, कॉन्ट्रॅक्टर, मेडिकल, केमिस्ट, व्यापारी तसेच विविध सामाजिक संघटना सहभागी होणार आहेत़ नागरीकत्व कायद्याचे समर्थनासाठी या रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे़ उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे़
हिंदू सेवा संघातर्फे निवेदऩ़़
येथील हिंदू सेवा संघातर्फे पाठींबा असल्याचे पत्र येथील प्रांताधिकाऱ्यांना देण्यात आले़ निवेदनात, नागरीकता संशोधन कायदा २०१९ च्या विरोधात काही देश विघटक शक्ती देशात अराजकता माजवित आहेत़ देशात अनेक ठिकाणी जाळपोळ, दगडफेक करून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करीत आहेत़ त्यामुळे सामान्य माणसाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे़
संसदेत मंजूर झालेल्या या निर्णयास येथील हिंदू सेवा संघाचा पाठींबा असल्याचे निवेदनात म्हटले आहे़ निवेदन देतेवेळी संघाचे अध्यक्ष सुनिल सुर्यवंशी, उपाध्यक्ष शशिकांत चौधरी, अॅड़विजय पाटील, अॅड़महेश वाघ, भोपाल देशमुख, शशिकांत बडगुजर आदी उपस्थित होते़