रुग्णांच्या शोषणाविरुद्ध लढा उभारा : डॉ. योगेश सूर्यवंशी : जिव्हाळा रुग्ण हक्क समितीची स्थापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:35 AM2021-04-10T04:35:17+5:302021-04-10T04:35:17+5:30

धुळे येथे स्थापन करण्यात आलेल्या जिव्हाळा रुग्ण हक्क समितीचे उद्घाटन डाॅ. सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. डॉ. सुर्यवंशी म्हणाले, ...

Raise the fight against the exploitation of patients: Dr. Yogesh Suryavanshi: Establishment of Compassionate Patient Rights Committee | रुग्णांच्या शोषणाविरुद्ध लढा उभारा : डॉ. योगेश सूर्यवंशी : जिव्हाळा रुग्ण हक्क समितीची स्थापना

रुग्णांच्या शोषणाविरुद्ध लढा उभारा : डॉ. योगेश सूर्यवंशी : जिव्हाळा रुग्ण हक्क समितीची स्थापना

Next

धुळे येथे स्थापन करण्यात आलेल्या जिव्हाळा रुग्ण हक्क समितीचे उद्घाटन डाॅ. सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले.

डॉ. सुर्यवंशी म्हणाले, डाॅक्टर जीवाची तमा न बाळगता रुग्णांवर औषधोपचार करतात. ग्राहक संरक्षण कायद्यान्वये रुग्णांना चांगली सेवा देणे हे डॉक्टरांचे कर्तव्य जरी असले तरी रुग्णांनीदेखील डॉक्टरांच्या अडीअडचणी व मर्यादा समजून घेतल्या पाहिजेत रुग्णांचे हक्क व अधिकाराबाबत प्रबोधन करण्यासाठी सामाजिक चळवळींची सध्या आवश्यकता असल्याचे सांगून जिव्हाळा रुग्ण हक्क समितीच्या कार्याला त्यांनी यावेळी शुभेच्छा दिल्यात.

जिव्हाळा रूग्ण हक्क समितीचे मुख्य समन्वयक ॲड. विनोद बोरसे यांनी आपले प्रास्ताविक करतांना सांगितले की, भारतीय राज्यघटनेनुसार प्रत्येक भारतीयाला सन्मानाने जीवन जगण्याचा अधिकार असून रुग्णांना योग्य उपचार मिळणे हा त्यांचा घटनात्मक हक्क आहे. त्यामुळे रुग्ण हक्क समितीच्या माध्यमातून रुग्णांच्या समस्या सोडविण्यासह रुग्णांचे हक्क व अधिकाराबाबत प्रबोधन करण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे ॲड. बोरसे यांनी यावेळी सांगितले.

कार्यक्रमाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. एस. जे. चौधरी, औषधविक्रेता संजय बंब, औषध निर्माणशास्त्र विद्यार्थी प्रज्वल निकम यांची उपस्थिती होती. आरोग्य क्षेत्रात सामाजिक कार्य करण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांनी समितीत सहभागी व्हावे, असे आवाहन ॲड. विनोद बोरसे यांनी केले.

Web Title: Raise the fight against the exploitation of patients: Dr. Yogesh Suryavanshi: Establishment of Compassionate Patient Rights Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.