पावसामुळे घरांच्या भिंती व छत्त कोसळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2020 13:43 IST2020-07-24T13:42:21+5:302020-07-24T13:43:21+5:30
नेर : नुकसान भरपाई देण्याची मागणी

पावसामुळे घरांच्या भिंती व छत्त कोसळले
लोकमत न्यूज नेटवर्क
नेर : नेरसह परिसरात बुधवारी झालेल्या जोरदार पावसाने नेर गावातील आठ ते दहा घरांच्या भिंती पडून नागरिकांचे नुकसान झाले आहे. गेल्या वर्षी झालेल्या नुकसाची भरपाई अद्यापही न मिळाल्याने या अनेकांचा संसार उघड्यावर आला आहे.
नेरसह परिसरात बुधवारी दुपारी जोरदार पावसाला सुरुवात झाली. सुमारे दोन ते तीन तास झालेल्या या पावसाने शेतकऱ्यांची आबादाणी झाली आहे. तर काल झालेल्या पावसाची ९५ मि.मी नोंद करण्यात आली आहे.
या दमदार पावसाचा पिकांना मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे उत्पन्न वाढीची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. या पावसामुळे नेर शिवारातील लहान, मोठ्या नाल्यात बºयापैकी पाण्याचा साठा झाला आहे. त्यामुळे शेतकºयांच्या विहिरींना याचा मोठा फायदा होणार आहे. खरीपाबरोबरच रब्बीचाही हंगाम शेतकºयांना घेता येणार आहे. यामुळे शेतकºयांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
पावसामुळे घरे पडून
संसार उघड्यावर
नेर गावात गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक नागरिकांच्या घरांच्या भिंती पडल्या होत्या. धाबेही खचले होते. या घरांचे पंचनामेही करण्यात आले होते. परंतु त्याची नुकसान भरपाई नागरिकांना अद्यापही मिळाली नाही. त्यामुळे नागरिकांनी आहे ती घरेच दांड्या आणि प्लास्टीक कागद लावून सावरली होती. त्यातच त्यांचा संसार सुरू असल्याने यंदाही बुधवारी झालेल्या जोरदार पावसामुळे अनेकांची घरे पडली आहे.
त्यात गेल्या वर्षी नुकसान झालेल्यांचीही घरे पुन्हा कोसळली आहेत. त्यामुळे आता त्यांचा पूर्ण संसार हा उघड्यावर आला आहे. त्यामुळे गेल्यावर्षासह काल झालेल्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचीही भरपाई त्वरित मिळावी, अशी मागणी नुकसानग्रस्त नागरिकांकडून करण्यात येत आहे.