बेवारस मृतांच्या नातेवाइकांना शोधताना रेल्वे पोलिसांची दमछाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:44 IST2021-02-05T08:44:53+5:302021-02-05T08:44:53+5:30
मृतदेहाची ओळख पटलीच नाही - रेल्वे अपघात काही वारंवार होत नसतात. ज्यावेळेस होतात त्यावेळेस परिस्थितीनुसार निर्णय घेतल्याशिवाय पर्याय राहत ...

बेवारस मृतांच्या नातेवाइकांना शोधताना रेल्वे पोलिसांची दमछाक
मृतदेहाची ओळख पटलीच नाही
- रेल्वे अपघात काही वारंवार होत नसतात. ज्यावेळेस होतात त्यावेळेस परिस्थितीनुसार निर्णय घेतल्याशिवाय पर्याय राहत नाही. अशावेळेस मृतदेहाची ओळख कशी पटेल, याचा देखील गांभिर्याने विचार करावा लागतो.
- मृतदेह आढळल्यानंतर त्याच्या तपासणीतून त्याच्या स्वत:च्या ओळखीचे काही धागेदोरे मिळतात का? याचा देखील सुगावा लावण्याचा प्रयत्न पोलिसांकडून होत असतो. त्यात काही सापडल्यास त्यांच्यापर्यंत संपर्क करून मृतदेह त्यांच्याकडे आवश्यकत ती पूर्तता करून सोपिवला जातो.
अधिकारीचा कोट
अपघाताची घटना केव्हा घडेल हे काेणीही सांगू शकत नाही. रेल्वे अपघाताचीसुद्धा तीच स्थिती आहे. अपघात घडल्यानंतर सर्वात अगोदर कोणत्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना आहे, हे तपासून त्या पोलिसांना कळविले जाते. मृतदेहाची अवहेलना न होता त्यांच्यावर अंतिम सोपस्कार पार पाडण्याची जबाबदारी पार पाडावी लागते.
- चंद्रकांत सातपुते
पोलीस उपनिरीक्षक, रेल्वे, धुळे.
२०१९ - अपघात ०२, मृत्यू ०२
२०२० - अपघात ००, मृत्यू ००