थंडीच्या आगमनाने रब्बी हंगामास गती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 11:39 AM2019-11-19T11:39:12+5:302019-11-19T11:39:44+5:30

वडजाई परिसरातून नुकसानीची मागणी : पुढील हंगामासाठी शेतकऱ्यांपुढे मोठे आव्हान

Rabbi season speeds up with the arrival of cold | थंडीच्या आगमनाने रब्बी हंगामास गती

Dhule

Next

मालपूर/वडजाई : शिंदखेडा तालुक्यातील मालपूर परीसरात थंडीचे आगमन झाल्याने शेतकऱ्यांनी रब्बी हंगामाच्या हालचालींना सुरुवात केली आहे. तर गुलाबी थंडीचा आनंद लुटण्यासाठी भल्या पहाटे उठून ग्रामस्थ फेरफटका मारतांना दिसून येते आहेत.
यावर्षी परतीचा पाऊस पडल्याने साहजिकच थंडीही लांबणीवर पडली. मात्र सध्या थंडी अवतरली आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या म्हणण्यानुसार १५ नोव्हेंबरला राज्यभर गारठण्याची नोंद असून ठिकठिकाणचे किमान तापमान १५ अंशाच्या आसपास नोंदवण्यात आले आहे.
यामुळे आल्हाददायक वातावरणचा आनंद लुटण्यासाठी येथील नागरिक भल्यापहाटे उठून फेरफटका मारतांना दिसत आहेत. यात उत्तरोत्तर वाढ होतांना असल्यामुळे अवकाळी पावसाचे दु:ख बाजूला सारत येथील शेतकºयांनी रब्बी हंगामाच्या हालचालींना सुरुवात केली आहे. कापसाचे पीके असलेले शेतशिवार खाली करुन गहु, हरभरा आदी पिके घेण्याच्या तयारीस लागले आहेत.
यावर्षी येथे विहिरी ओसांडून वाहत असल्यामुळे रब्बीचे क्षेत्रफळ वाढणार असल्याचे सांगण्यात येत आहे. खरिपातील कसर रब्बीत भरून निघेल अशी येथील शेतकºयांना आशा लागुन आहे. यासाठी बांधावर रब्बीचे गहु, हरभराचे बियाणे अनुदानात उपलब्ध करून देण्याची गरज असून कृषी विभागाने यासाठी मदतीचा हात शेतकºयांना पुढे करावा, अशी येथील शेतकºयांची मागणी आहे.

Web Title: Rabbi season speeds up with the arrival of cold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे