रब्बी हंगाम : सदोष डीपीमुळे पिके जळाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:33 IST2021-02-07T04:33:45+5:302021-02-07T04:33:45+5:30
यावर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचा हंगाम वाया गेला. पाण्याची पातळी वाढल्याने रब्बी पिकांवर आशा होती. परंतु वीजपुरवठा वारंवार बंद पडत ...

रब्बी हंगाम : सदोष डीपीमुळे पिके जळाली
यावर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचा हंगाम वाया गेला. पाण्याची पातळी वाढल्याने रब्बी पिकांवर आशा होती. परंतु वीजपुरवठा वारंवार बंद पडत असल्याने शेवटच्या एका पाण्यासाठी पिके जळाली आहेत. डीपी जळल्याने शेतकऱ्यांनी प्रत्येकी दोन हजार रुपये भरले, मात्र नवीन प्रत्येक डीपी अवघ्या काही तासात जळून जाते. चारवेळा नवीन डीपी बसवूनसुद्धा सदोष यंत्रणेमुळे वीजपुरवठा सुरू होऊ शकला नाही.
पिके वाचविण्यासाठी काही शेतकऱ्यांनी डिझेल पंप बसवले आहेत. परंतु महागडे इंधन भरून पाणी भरताना मोठा खर्च येत आहे. डीपी जळाली म्हणजे वायरमन तपासणी करतात, दुसरे दिवशी ऑफिसला रिपोर्ट जातो, काही दिवसांनी डीपी येते, एक दिवस कार्यान्वित करून दुसरे दिवशी वीजपुरवठा सुरू करतात. यात एक आठवडा जातो अन् अखेर जळलेली डीपी असल्याचे दिसून येते. चारवेळा ही प्रक्रिया सुरू असल्याने एक महिना वीजपुरवठा बंद आहे.
तक्रारी नंतर वीज अधिकारी डीपी बदलतात, परंतु नवीनदेखील नादुरुस्त
असली तरी आठ दिवसांपर्यंत तक्रारी बंद होतात. हे सारे टाइमपासचे धोरण असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे. या टाइम पास धोरणात मात्र शेतकऱ्यांची पिके जळाली आहेत. पैसे भरून देखील वीजपुरवठा करू न शकणाऱ्या वीज मंडळाने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
( वीज पंप बंद असल्याने डिझेल मशीन आणले, यात इंधन व मशीन भाडे याचा खर्च वाढला आहे. भाडे दहा हजार व इंधन १३ हजार खर्च लागल्याने रब्बीत नफा राहणे कठीण झाले आहे )
---
शेतकरी संजय रोकडे
( लवकरच विशेष योजनेत योग्य क्षमतेची डीपी बसविली जाईल. प्रयत्न सुरू आहेत. )---
ग्रामीण उपकार्यकरी अभियंता एन बी गांगोडे .