प्रा. डॉ. दत्ता ढाले यांना संशोधनातील जागतिक मानांकन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:23 IST2021-07-03T04:23:03+5:302021-07-03T04:23:03+5:30
जगभरातील १८१ देशांतील १० हजार ६५५ विद्यापीठांतील ५ लाख ६५ हजार ५५३ संशोधकांतून निवडीमधून वर्ल्ड सायंटिफिक अँड युनिव्हर्सिटी ...

प्रा. डॉ. दत्ता ढाले यांना संशोधनातील जागतिक मानांकन
जगभरातील १८१ देशांतील १० हजार ६५५ विद्यापीठांतील ५ लाख ६५ हजार ५५३ संशोधकांतून निवडीमधून वर्ल्ड सायंटिफिक अँड युनिव्हर्सिटी रँकिंग २०२१ तयार केले आहे. यामध्ये कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव परिक्षेत्रातील ३५ संशोधकांचा समावेश आहे. त्यामधील विद्यापीठ परिक्षेत्रातील अकॅडमिक महाविद्यालयातून डॉ. ढाले हे एकमेव प्राध्यापक एकविसाव्या स्थानी आहेत.
डॉ. ढाले यांचे आतापर्यंत ८५ पेक्षा अधिक शोधनिबंध वेगवेगळ्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध झाले आहेत. शंभराहून अधिक वेगवेगळ्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये आपल्या संशोधन लेखांचे वाचन केले आहे. वेगवेगळ्या २२ नियतकालिकांच्या संपादकीय मंडलावर ते सक्रियपणे काम करतात. त्यांना उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने पीएच.डी. संशोधन मार्गदर्शक म्हणूनही मान्यता दिलेली आहे. सर्वसामान्य माणसासाठी त्यांनी मराठी भाषेमधून 'महाराष्ट्रातील औषधी वनस्पती संग्रह' या पुस्तकाचे लेखन केले आहे, तसेच भारतातील 'स्पायसेस अँड कोंडिमेंट्स' सह एकूण तीन पुस्तकांचे लिखाण त्यांनी केले आहे. या त्यांच्या कार्याची दखल घेत वेगवेगळ्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांचे त्यांना १३ पुरस्कार मिळाले आहेत. नुकताच त्यांना महाराष्ट्र शासनाचा राष्ट्रीय सेवा योजनामध्ये उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी पुरस्कार जाहीर झाला आहे.
निवडीबद्दल रोहिदास पाटील, संस्थेचे अध्यक्ष डॉ. भाईदास पाटील, संस्थेचे चेअरमन आमदार कुणाल पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. एस. टी. पाटील, प्रफुल्ल शिसोदे, संस्थेचे प्रशासकीय अधिकारी प्रमोद पाटील, प्राचार्य डॉ. मनोहर पाटील, उपप्राचार्य प्रा. के. एम. बोरसे, डॉ. संध्या पाटील यांनी कौतुक केले आहे.