धुळ्यात वाहतूक शाखेच्या पोलिसाला धक्काबुक्की

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 23:01 IST2017-12-22T23:01:04+5:302017-12-22T23:01:47+5:30

तहसील कचेरीजवळील घटना, पोलिसात गुन्ह्याची नोंद

Pushing to the traffic branch of Dhule | धुळ्यात वाहतूक शाखेच्या पोलिसाला धक्काबुक्की

धुळ्यात वाहतूक शाखेच्या पोलिसाला धक्काबुक्की

ठळक मुद्देतहसील कचेरीजवळील घटना शहर वाहतूक शाखेच्या कर्मचाºयाला धक्काबुक्कीदोन जणांविरोधात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : शहरातील तहसील कचेरीजवळ वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचाºयास शुक्रवारी सायंकाळी सव्वापाच वाजेच्या सुमारास दोघांकडून धक्काबुक्की करण्यात आली़ याप्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला़ 
वाहतूक शाखेचे नंदू नारायण विसपुते यांनी फिर्याद दाखल केली़ त्यानुसार दुचाकीचालक शाहरुख जब्बार बागवान (२०) आणि बबलू मोहम्मद सलिम बागवान (२१) रा़ मुल्लावाडा, गल्ली नंबर २ यांच्या विरोधात रात्री गुन्हा नोंदविण्यात आला़ घटनेचा तपास सुरु आहे़  

Web Title: Pushing to the traffic branch of Dhule