विनामास्क फिरणाऱ्या ८५४ जणांवर दंडात्मक कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:34 IST2021-03-28T04:34:01+5:302021-03-28T04:34:01+5:30
शहरात कोरोना संसर्गजन्य आजाराचे रुग्ण गेल्या काही दिवसांपूर्वी मोठ्या प्रमाणात आढळून येत असल्याने ग्रामपंचायतीने विशेष मोहीमेत पोलिस प्रशासनाच्या सहकार्याने ...

विनामास्क फिरणाऱ्या ८५४ जणांवर दंडात्मक कारवाई
शहरात कोरोना संसर्गजन्य आजाराचे रुग्ण गेल्या काही दिवसांपूर्वी मोठ्या प्रमाणात आढळून येत असल्याने ग्रामपंचायतीने विशेष मोहीमेत पोलिस प्रशासनाच्या सहकार्याने गावात विना मास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करीत शिस्तीचा बडगा उचलला होता यात ग्रामपंचायतीने वेळोवेळी ही मोहीम वापरून शहरातील रुग्णसंख्या वाढणार नाही याची विशेष काळजी घेतली शहरातील रुग्णसंख्या आज काही प्रमाणात आटोक्यात आहे. तरीदेखील नागरिकांनी विना मास्क बाहेर फिरून नये तसेच मास्कचा वापर करावा सोशल डिस्टंसिंग चे पालन करावे असे आव्हान सरपंच, उपसरपंच, ग्राम दक्षता समिती अध्यक्ष व ग्रामविकास अधिकारी डी.डी.चौरे यांनी केले आहे.
तसेच या पूर्वीही ग्रामपंचायतीने विना मास्क फिरणाऱ्यांवर साधारण ५०१५० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. शहरात २९ मार्च पर्यंत सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले आहे तरी वाढती रुग्ण संख्या पाहता कोरोना रुग्ण संख्या वाढणार नाही याची काळजी घ्यावी व आपल्या परिवाराची काळजी घेत गावाला कोरोना पासून दूर ठेवण्याचे आव्हान सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर व ग्रामविकास अधिकारी डी डी चौरे यांनी केले आहे.