पुणे एसटी रिकामीच, पुणे बससाठी आरक्षण करणाऱ्या प्रवाशांची संख्या घटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:36 IST2021-03-26T04:36:13+5:302021-03-26T04:36:13+5:30
अहमदाबादला प्रतिसाद - गुजरात मार्गावर धावणाऱ्या बसला चांगला प्रतिसाद मिळत आहे. यात अहमदाबाद, सुरत व गुजरात बसचा समावेश आहे. ...

पुणे एसटी रिकामीच, पुणे बससाठी आरक्षण करणाऱ्या प्रवाशांची संख्या घटली
अहमदाबादला प्रतिसाद -
गुजरात मार्गावर धावणाऱ्या बसला चांगला प्रतिसाद मिळत आहे. यात अहमदाबाद, सुरत व गुजरात बसचा समावेश आहे. मात्र या मार्गावरही आरक्षित सीटसाठी वेटिंग नाही. प्रत्येक प्रवाशाला सहज सीट उपलब्ध होत आहे. अहमदाबादसाठी दररोज सकाळी दोन व बडोदाला जाण्यासाठी रात्री दोन बस आहेत.
जिल्ह्याबाहेर जाणाऱ्यांची संख्या घटली -
जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढली आहे. त्याचा परिणाम जिल्ह्याबाहेर जाणाऱ्या प्रवाशांच्या संख्येवर झाला आहे. अनेक बस कमी प्रवाशांसह धावत आहेत. तर पुणे, मुंबई मार्गावरील प्रवाशांची संख्या रोडावल्याचे चित्र आहे. गुजरात राज्यात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मात्र कायम आहे.
प्रतिक्रिया -
कोरोनाच्या वाढत्या रुग्णांचा परिणाम काही बसफेऱ्यांवर झाला आहे. मात्र गुजरात राज्यात जाणाऱ्या बसला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. अहमदाबाद व बडोदा बसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद आहे. कोरोनाच्या वाढलेल्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर काळजी घेत आहोत. वाहक व चालकांनाही कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करण्याबाबत सूचना केल्या आहेत.
- अनुजा दुसाने, आगारप्रमुख
रातराणी केवळ ५ -
बस आगारातून केवळ ५ रातराणी बस धावत असल्याची माहिती मिळाली. त्यात पुणे मार्गावर धावणाऱ्या तीन व गुजरातमध्ये जाणाऱ्या दोन बसचा समावेश आहे. बडोदासाठी रात्री पहिली बस ८ वाजता तर दुसरी बस ९ वाजून ३० मिनिटांनी निघते. कोरोनाच्या प्रादुर्भाव वाढण्याच्या आधी रातराणी गाडीला चांगला प्रतिसाद मिळत होता.
६५० फेऱ्या रोज -
धुळे आगारातून विविध मार्गांवर धावणाऱ्या बसेसच्या ६५० फेऱ्या रोज होत आहेत. त्यात लांब पल्ल्याच्या गाड्या अधिक आहेत. शाळा बंद असल्यामुळे खास विद्यार्थ्यांसाठी सुरू असलेल्या बहुतेक गाड्या मात्र सध्या बंद आहेत. तसेच धुळे आगारातून मोठ्या प्रमाणावर बसेस मध्य प्रदेशात जातात. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर मध्य प्रदेशातील बस फेऱ्या बंद करण्यात आलेल्या आहेत. तसेच मध्य प्रदेश परिवहनच्या गाड्याही सध्या बंद आहेत. मध्य प्रदेशच्या सीमेपर्यंतच बस फेऱ्या सुरू आहेत. तसेच अनेक शिवशाही गाड्यांना प्रतिसाद नसताना व महामंडळाच्या बसेस उभ्या असताना शिवशाहीच्या फेऱ्या मात्र जैसे थे आहेत.