जिल्ह्यात ५८ तासांसाठी जनता कर्फ्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:34 IST2021-03-28T04:34:05+5:302021-03-28T04:34:05+5:30
शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झालेला आहे. शहरात आतापर्यंत १०,६५७ जणांना कोरोनाची लागण झाली आहे, तर १७९ कोरोना ...

जिल्ह्यात ५८ तासांसाठी जनता कर्फ्यू
शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झालेला आहे. शहरात आतापर्यंत १०,६५७ जणांना कोरोनाची लागण झाली आहे, तर १७९ कोरोना बाधितांचा मृत्यू झालेला आहे. शहरात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मनपाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहे. त्यासाठी सकाळी ८ ते सायंकाळी ८ पर्यंत व्यापाऱ्यांना व्यवसाय करण्यासाठी वेळ निश्चित करून देण्यात आली आहे.
आग्रा रोडवर शनिवारी नेहमी प्रमाणे गजबजलेला दिसून आला. येथील हातगाडी व फेरीवाले विक्रेत्यांनी पोलिसांकडून कारवाई होऊ नये, यासाठी नावालाच मास्क लावलेला दिसून आला. तर काहींनी कारवाईच होत नाही. म्हणून दुर्लक्ष केल्याचे दिसून आले. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी रिक्षा चालकांना प्रवासी संख्या कमी ठेवण्याचे आदेश दिले आहेत. असे असताना अनेक रिक्षांमध्ये प्रवासी संख्या प्रमाणापेक्षा अधिक असल्याचे दिसून आले तर काही जण विनामास्क फिरतानाही दिसून आले.
महानगरात सायंकाळी साडेपाच वाजेपासून शुकशुकाट
संचारबंदीचे आदेश लागू करण्यात आल्याने सायंकाळी ७ वाजेपासून पोलीस पथकाकडून व्यावसायिकांना दुकाने बंद करण्याचे आवाहन करण्यात येत होते. सायंकाळी ७ वाजेनंतर शहरातील आग्रा रोड, फुलवाला चाैक, पारोळा रोड, पाचकंदील, बारापत्थर, माैलवीगंज अशा भागात शुकशुकाट दिसून आला. दरम्यान फाशी पूलकडे जाणारा रस्ता बंद करण्यात आला होता. तसेच बसस्थानक व पेट्रोल पंपावरदेखील शुकशुकाट दिसून आला. संचारबंदी लागू झाल्याने, सायंकाळपासून पोलिसांनी गस्त वाढवली होती. या कालावधीत अत्यावश्यक सेवा म्हणून पेट्रोलियम पदार्थ, दूध, भाजीपाला, औषधी, धान्य, वैद्यकीय उपकरणे आदींच्या वाहतुकीसाठी सवलत देण्यात आली आहे.
होळी व धूलिवंदन साध्या पद्धतीने साजरा करा
कोरोना संसर्ग टाळण्यासाठी प्रशासनाने जनता कर्फ्यू लागू केका आहे. या कालावधीत येणारी होळी व धूलिवंदन साध्या पद्धतीने साजरा करावे, नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने बंद पाळावे तसेच गर्दी टाळण्यासाठी सार्वजनिक ठिकाण, हॉटेल्स, रिसॉर्ट, सभागृहे, खासगी मोकळ्या जागा, सर्व गृहनिर्माण संस्थांच्या मोकळ्या जागा आदी ठिकाणी साजरी होणारी होळी, धूलिवंदन आणि शबे बारात उत्सव साजरा करण्यास मनाई आहे.
पोलिसांची राहणार लक्ष
नियमांचे पालन होत आहे किंवा नाही यावर लक्ष ठेवण्यासाठी पाेलिसांचे पथक नियुक्त केले आहे. या कालावधीत नियमाचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा व मनपा प्रशासनाकडून केले आहे.