अवधान तलाव खोलीकरणासाठी निधी उपलब्ध करून द्या : आमदार फारूक शाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:25 IST2021-06-03T04:25:48+5:302021-06-03T04:25:48+5:30

धुळे शहरातील अवधान गावात पाण्याची मोठ्या प्रमाणात टंचाई निर्माण होत असल्याने अवधान शिवारात असलेल्या तलावव बंधारा खोलीकरणासाठी दोन कोटी ...

Provide funds for Awadhan Lake deepening: MLA Farooq Shah | अवधान तलाव खोलीकरणासाठी निधी उपलब्ध करून द्या : आमदार फारूक शाह

अवधान तलाव खोलीकरणासाठी निधी उपलब्ध करून द्या : आमदार फारूक शाह

धुळे शहरातील अवधान गावात पाण्याची मोठ्या प्रमाणात टंचाई निर्माण होत असल्याने अवधान शिवारात असलेल्या तलावव बंधारा खोलीकरणासाठी दोन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा, अशा मागणीचे निवेदन आमदार फारूक शाह यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली.

शहरालगत अवधान गाव परिसरात अनेक वर्षांपासून पाण्याची टंचाई आहे. त्यामुळे अवधान हे गाव दुष्काळग्रस्त गाव असल्याने उन्हाळ्यात प्रचंड पाण्याची टंचाई निर्माण होते. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ येते. गावाजवळ असलेला जुना तलावात फक्त पावसाळ्यातच तेथे पाणी साचते उन्हाळ्यात तलाव पूर्णपणे कोरडा होऊन जातो. एम.आय.डी.सी. तलावाचे पाणी परिसरात केमिकलयुक्त असल्याने ते पिण्यायोग्य नाही. या तलावाचे खोलीकरण व आजूबाजूला दगडी पिचिंग केल्यास वाहून जाणारे पाणी अडविता येऊ शकते. त्या अनुषंगाने आमदार फारूक शाह यांनी जलसंपदा मंत्री नामदार जयंत पाटील यांची भेट घेऊन २ कोटी रुपये निधी मंजूर करावा, अशी मागणी केली.

Web Title: Provide funds for Awadhan Lake deepening: MLA Farooq Shah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.