धुळे जिल्ह्यातील मतदान केंद्रावर सुविधा उपलब्ध करून द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 12:04 IST2019-12-26T12:04:15+5:302019-12-26T12:04:44+5:30

गंगाथरन डी. : मतदान पूर्वतयारी आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना दिल्या सूचना

Provide facilities at polling booths in Dhule district | धुळे जिल्ह्यातील मतदान केंद्रावर सुविधा उपलब्ध करून द्या

धुळे जिल्ह्यातील मतदान केंद्रावर सुविधा उपलब्ध करून द्या

आॅनलाइन लोकमत
धुळे : धुळे जिल्हा परिषद व त्याअंतर्गत धुळे, साक्री, शिंदखेडा व शिरपूर पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ७ जानेवारी २०२० रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रांवर वीज पुरवठ्यासह आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करुन देत तत्काळ अहवाल सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी दिले आहेत.
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांच्या दालनात पूर्वतयारीबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपजिल्हाधिकारी उन्मेश महाजन (प्रशासन), जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जे. ए. तडवी, बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता वर्षा घुगरी, माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. सुभाष बोरसे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता सूर्यवंशी आदी उपस्थित होते. दरम्यान ७ जानेवारी रोजी मतदान असून त्याच्या अगोदरच सर्व सुविधा पूर्ण कराव्या लागतील.

Web Title: Provide facilities at polling booths in Dhule district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे