आंबेडकरनगरसह चार झोपडपट्टीवासीयांना हक्काचे घर देण्याचा प्रस्ताव सादर : चार जागांचे सर्वेक्षण पूर्ण : अतिक्रमण नियमानुकूल करण्याच्या प्रक्रियेला चालना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:23 IST2021-06-21T04:23:40+5:302021-06-21T04:23:40+5:30
शहरातील अतिक्रमित जागा रहिवाशांच्या नावावर करणार आहेत. मात्र, याकरिता २०११ पूर्वीचा रहिवासी पुरावा असावा. त्यात घरपट्टी, वीज बिल, रेशन ...

आंबेडकरनगरसह चार झोपडपट्टीवासीयांना हक्काचे घर देण्याचा प्रस्ताव सादर : चार जागांचे सर्वेक्षण पूर्ण : अतिक्रमण नियमानुकूल करण्याच्या प्रक्रियेला चालना
शहरातील अतिक्रमित जागा रहिवाशांच्या नावावर करणार आहेत. मात्र, याकरिता २०११ पूर्वीचा रहिवासी पुरावा असावा. त्यात घरपट्टी, वीज बिल, रेशन कार्ड, कुटुंबाचा फोटो आदी कागदपत्रांचा समावेश आहे. २०११ पूर्वीच्या रहिवासी नागरिकांचीच घरे नावावर हाेणार आहेत.
अतिक्रमित घरे नावावर करताना ५०० ते १ हजार चौरस फुटांसाठी रेडीरेकनर दराच्या १० टक्के व १ हजार ते १ हजार ५०० चौरस फुटांसाठी २५ टक्के शासकीय फी भरावी लागणार आहे. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या कुटुंबांना फी माफ करण्यात आली आहे.
...असे आहेत चार प्रस्ताव
नकाने रोडवरील साईबाबानगर, डाॅ. बाबासाहेब आंबेडकरनगर, फाशीपूल भागातील एकलव्यनगर आणि ऐंशी फुटी रस्त्यालगतचे रमजानबाबानगर या चार झोपडपट्ट्यांमधील जागांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. त्यामुळे जागा नावावर करून देण्यासाठी साईबाबानगर आणि आंबेडकरनगरचे दोन प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात, तर एकलव्यनगर आणि रमजानबाबानगरचे प्रस्ताव महापालिकेकडे पाठविले आहेत.