फॅन्सी नंबर प्लेटचे प्रमाण वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:47 IST2021-02-05T08:47:16+5:302021-02-05T08:47:16+5:30

बसेसमध्ये अस्वच्छता वाढली धुळे : लॉकडाऊननंतर एस. टी. महामंडळाची बससेवा पूर्ववत सुरू झालेली आहे. मात्र, बसमध्ये अस्वच्छतेचे प्रमाणही तेवढेच ...

The proportion of fancy number plates increased | फॅन्सी नंबर प्लेटचे प्रमाण वाढले

फॅन्सी नंबर प्लेटचे प्रमाण वाढले

बसेसमध्ये अस्वच्छता वाढली

धुळे : लॉकडाऊननंतर एस. टी. महामंडळाची बससेवा पूर्ववत सुरू झालेली आहे. मात्र, बसमध्ये अस्वच्छतेचे प्रमाणही तेवढेच वाढलेले आहे. ग्रामीण भागात जाणाऱ्या बसगाड्यांची तर स्वच्छताच करण्यात येत नाही, अशी प्रवाशांची तक्रार आहे.

तहसीलजवळच पार्किंगचा बोजवारा

धुळे : येथील तहसील कार्यालयात कामानिमित्त येणाऱ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे. अनेकजण दुचाकीने येत असतात. मात्र, या कार्यालयाच्या परिसरात पार्किंगची व्यवस्था नसल्याने येणारे नागरिक रस्त्यावरच वाहने उभी करतात. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होत असते.

जुन्या नोटांबाबत खुलासा करणे गरजेचे

धुळे : गेल्या आठवड्यापासून १००, १० व पाच रुपयांच्या जुन्या नोटा बंद होणार असल्याची चर्चा आहे. या चर्चेमुळे नागरिक आता या नोटा घेण्यास तयार नाहीत. या नोटा बँकेत जमा करण्याचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे केंद्र शासनाने याबाबत खुलासा करणे गरजेचे आहे.

Web Title: The proportion of fancy number plates increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.