शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

भाजपतर्फे गुंडगिरीला प्रोत्साहन, हा घ्या संभाषणाचा मोठा पुरावा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 23:18 IST

भाजपचे येथील आमदार अनिल गोटे यांनी सोमवारी घेतलेल्या पत्रपरिषदेत माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे  : आपल्यासह कुटुंबीयांविषयी आक्षेपार्ह मजकूर सोशल मीडियावर व्हायरल करणाºया विनोद थोरातला भाजपच्या मंत्र्यांसह पदाधिकाºयांची फूस असून पक्षातर्फे गुंडगिरीला प्रोत्साहन दिले जात असल्याचा आरोप भाजपचे येथील आमदार अनिल गोटे यांनी सोमवारी घेतलेल्या पत्रपरिषदेत केला. त्या पुष्ट्यर्थ त्यांनी पोलीस अधिकारी व नागरिक यांच्यात झालेल्या संभाषणाची ध्वनिफीतही माध्यमांच्या प्रतिनिधींना उपलब्ध केली. याचवेळी मनसेचे शहराध्यक्ष डॉ.मनिष जाखेटे यांनी महापालिका निवडणुकीत लोकसंग्रामला विनाशर्त पाठिंबा दिल्याची माहिती दिली. आक्षेपार्ह मजकूर सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी विनोद थोरात याच्याविरूद्ध आझादनगर पोलिसांत हेमा गोटे यांच्या फिर्यादीवरून विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी या प्रकरणी थोरात यास चाळीसगाव येथून त्याच्या नातेवाईकाच्या घरून अटक केली. येथे आणून त्यास मोहाडी उपनगर पोलीस ठाण्याच्या लॉकअप ठेवण्यात आले होते. त्याचदिवशी त्याची जामिनावर मुक्तता करण्यात आली होती. या संदर्भात आपण पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन संभाषण ध्वनिफीती (सीडीआर)ची मागणी केली असल्याचेही आमदार गोटे यांनी यावेळी सांगितले.  गुन्हा दाखल झाल्यानंतर थोरात फरार झाला. तो इकडे-तिकडे लपत फिरत होता. शहरातील पोलीस यंत्रणा त्यास शोधण्याचा बहाणा करीत होती. त्यामुळे  आपणास पोलिसांना इशारा दिला. आणि त्याच दिवशी रात्री ११.३० वाजता पोलिसांनी थोरात यास चाळीसगाव येथून अटक करून मोहाडी उपनगर पोलीस ठाण्याच्या लॉकअपमध्ये ठेवले होते. दुसºया दिवशी कोर्टात हजर केल्यानंतर त्यास जामीन मंजूर करण्यात आला होता. पत्रपरिषदेवेळी आमदार गोटे यांनी दिलेल्या ध्वनिफीतीतील पोलीस अधिकारी व नागरिक यांच्यातील संवाद असा : नागरिक : मिळाला का? पोलीस अधिकारी : मग आणला ना, टाकला त्याला मोहाडी पोलीस ठाण्यात लॉकअपला. नागरिक  : कुठे मिळाला, पोलीस अधिकारी- चाळीसगावला, त्याच्या बहिणीकडे होता.नागरिक : काय म्हणत होता?पोलीस अधिकारी : काय म्हणेल, त्याचा कॉन्टॅक्ट सुरू होता  गिरीष महाजन, जयकुमार रावल, डॉ.सुभाष भामरे, हिरामण गवळी, नाना कर्पे यांच्याशी. तो सांगत होता मी सर्वांशी कॉन्टॅक्टमध्ये होतो. मला सर्व माहिती कळत होती.नागरिक : अजून कोणाचा फोन त्याला?पोलीस अधिकारी : आला होता ना भिकन वराडेंचा. मग त्याच्याकडून फोन घेऊन दिला स्वीचआॅफ करून. प्रभाग ९ मधील मनसे उमेदवाराच्या समर्थनार्थ हेमा गोटे यांची माघार, मात्र प्रभाग ५ मधून उमेदवारी कायम ४महाराष्टÑ नवनिर्माण सेनेच्या महानगर शाखेने या महापालिका निवडणुकीत आमदार अनिल गोटे यांच्या नेतृत्वात लढणाºया लोकसंग्राम पक्षाला विनाशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. या पक्षाचे शहराध्यक्ष डॉ.मनिष जाखेटे यांनी त्याबाबत या पत्रपरिषदेत माहिती दिली. समविचाराच्या आधारावर हा पाठिंंबा जाहीर केल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आमदार अनिल गोटे, लोकसंग्रामचे अध्यक्ष तेजस गोटे, मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश मोरे, निवडणूक प्रमुख योगेश मुकुंदे आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Dhuleधुळे