बुद्धप्रतिमेची रथावरून मिरवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 12:16 IST2019-05-19T12:14:15+5:302019-05-19T12:16:00+5:30
बुध्द पौर्णिमेनिमित्त शहरातून भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेची रथावरून मिरवणूक काढण्यात आली. तसेच ५० महिलांना पांढºया साड्या वाटप करण्यात आल्या. यासह विविध कार्यक्रम उत्साहात पार पडले.

भगवान गौतम बुध्द यांच्या रथावरील मिरवणुकीत मोठ्या संख्येने सहभागी समाजबांधव.
धुळे : बुध्द पौर्णिमेनिमित्त शहरातून भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेची रथावरून मिरवणूक काढण्यात आली. तसेच ५० महिलांना पांढºया साड्या वाटप करण्यात आल्या. यासह विविध कार्यक्रम उत्साहात पार पडले.
यावेळी बौद्ध धर्मगुरू प्रज्ञान दिप थेरो, रत्नशील सोनवणे यांच्यासह सामुदायिक त्रिशरण पंचशील म्हणून बुद्ध जयंती रथाचे पूजन करण्यात आले. आशाबाई सोनवणे यांच्या हस्ते साडया भेट देण्यात आले़ डॉ़ बाबा साहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मिरवणूक काढण्यात आली. भारतीय बौद्ध धम्म जागृती अभियान व एकच वाद आंबेडकरवाद कृती समिती यांच्यावतीने कार्यक्रम घेण्यात आला.
शहरातील नारायणराव अहिरे यांच्या निवासस्थानी महाप्रसाद कार्यक्रम घेण्यात आला.उदघाटन साहेबचंद जैन यांनी केले. प्रतिमा पूजन अॅड. रमेश सोनवणे, महेंद्र निळे, डॉ. बेडसे यांनी केले. यशस्वीतेसाठी मनोज बैसाणे, धनंजय गाळणकर, विक्रम करनकाळ यांनी योगदान दिले.